खेळ

आयसीसीच्या नियमावर अमिताभ बच्चन यांचा अफलातून ‘पंच’! चाहत्यांना हसू आवरेना

मुंबई | विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंड विरुध्द न्यूझीलंड सामना सुपरओव्हरमध्येही टाय झाल्यानंतर चौकारांच्या निकषावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. यानंतर आयसीसीच्या नियमावर अनेक आजी-माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. या नियमाविरोधात अजूनही सूर उमटत आहेत. त्यांच्याच सूरात सूर मिसळत बीग अमिताभ बच्चन यांनीही आयसीसीच्या या नियमाची खिल्ली उडवली आहे.

तुमच्याकडे 2000 हजार रूपये आहेत… माझ्याकडेही 2000 रूपये आहेत. तुमच्याकडे 2000 हजार रूपयांची एकच नोट तर माझ्याकडे 500 च्या 4 नोटा तर दोघांपैकी श्रीमंत कोण…?? तर ICC म्हणते ज्याच्याकडे 500 च्या 4 नोटा आहेत तो श्रीमंत…!, अशी उपरोधिक पोस्ट अमिताभ बच्चन यांनी शेअर करत ICC च्या नियमावर नाराजी व्यक्त केली आहे.

बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी देखील ICC वर टीका केली आहे. महेंद्रसिंग धोनीचा ग्लोव्हज कसला बदलताय?? त्याऐवजी मूर्खपणाचा सुपरओव्हरचा नियम बदला, अशा कठोर शब्दात त्यांनी आयसीसीवर टीका केली आहे.

जर सामना इतका उत्कंठावर्धक होत असेल तर चौकारांच्या निकषावरती विजेता कसा घोषित केला जाऊ शकतो? असा सवाल अनेकजण विचारत आहेत. 

हिटमॅन रोहित शर्मा, गौतम गंभीर, युवराज सिंग, मोहम्मद कैफ यांनी देखील या नियमावर नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, ज्या क्षणाची इंग्लंड आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण त्यांना अखेर अनुभवायला मिळाला. ऐतिहासिक लॉर्ड मैदानावर इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.

IMPIMP