Amitabh Dayal: अभिनेते अमिताभ दयाल यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन!

मुंबई | सिनेजगतासाठी सध्या दु:खद माहिती समोर आली आहे. अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ दयाल (Amitabh Dayal) यांचं आज पहाटे निधन झालं आहे.

अमिताभ दयाल यांनी वयाच्या 61 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अमिताभ दयाल यांना 17 जानेवारीला ह्रदयविकाराचा झटका आला होता.

त्यानंतर अमिताभ दयाल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. याच दरम्यान त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती देखील समोर आली होती.

अमिताभ दयाल यांनी सुमारे 4 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्यांनी लवकरच बरो होणार असल्याचं सांगितलं होतं.

उपचारानंतर शनिवारी ते कोरोनामुक्त झाले. मात्र आज पुन्हा एकदा त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे.

मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अखेर त्यांनी आज अखेरच्या श्वास घेतला आणि सिनेजगतातील एक जागा पोरकी केली.

अमिताभ दयाल यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे तसेच ते चित्रपट निर्माते देखील होते. अमिताभ यांनी दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्यासोबत ‘कागर: लाइफ ऑन द एज’ या चित्रपटातही काम केलं होतं.

पाहा व्हि़डीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Dayal (@amitabhdayal)


महत्त्वाच्या बातम्या – 

पोस्ट ऑफिसची ही योजना तुम्हाला करोडपती बनवेल, काही महिन्यांनंतर मिळतील ‘इतके’ लाख

“देशाचं नेतृत्व बदलायला हवं, लवकरच उद्धव ठाकरेंची भेट घेणार”

 एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका, ‘वयाच्या सतराव्या वर्षी…’

वाईन विक्रीबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मोठी बातमी! नितेश राणेंपाठोपाठ निलेश राणेंना देखील झटका, आता…