छत्रपतींनी संकटाच्या काळात पक्ष सोडू नये; खासदार अमोल कोल्हेंची भावनिक साद

सातारा : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर राष्ट्रवादीसाठी हा संकटाचा काळ आहे. अशा परिस्थितीत उदयनराजेंनी पक्ष सोडून जाऊ नये. ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असं राष्ट्रवादीचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. मात्र शरद पवारांचं उदयनराजेंवर प्रेम आहे. तसंच उदयनराजे यांच्याही मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर आहे, असं अमोल कोल्हेंनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.

संकटाच्या काळात उदयनराजेंनी थांबावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि कार्यकर्त्यांनी उदयनराजेंना तशी इच्छा बोलूनही दाखवली आहे. त्यामुळे ते तसा निर्णय घेतील अशी आशा आहे, असं मत कोल्हेंनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे भोसले जर भाजपत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती.

महत्वाच्या बातम्या-