किल्ल्यावर शुटींग केल्याबद्दल ट्रोल, अमोल कोल्हे म्हणतात…

भंडारा : महाराष्ट्र सरकारने गडकिल्ले भाडेतत्वावर देण्याच्या घेतलेल्या निर्णयावर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आणि सडकून टीकाही केली. पण त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाअगोदर त्यांनी पन्हाळा गडावर ‘मराठी टायगर्स’ या चित्रपटासाठी ‘हुरहुर लागे श्वासांना’ हे गाणं शूट झालं आहे, असं सांगत काही नेटकरी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. ट्रोल करणाऱ्यांना अमोल कोल्हेंनी चांगलंच सुनावलं आहे.

त्या चित्रपटाच्या विषयाचा आणि गड किल्ल्यांसंबंधी घेण्यात आलेल्या निर्णयाचा काही संबंध नाही. मत व्यक्त करण्याआधी विषय समजून घेणं गरजेचं आहे, भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत बोलताना त्यांनी टीका करण्यांना अमोल कोल्हेंनी उत्तर दिलं आहे.

गड किल्ल्यांचा विषय पुन्हा समोर आल्यामुळे टीकाकारांनी पुन्हा हा मुद्दा उचलून धरत अमोल कोल्हेंवर निशाणा साधला आहे. तुम्हाला गडांची इतकी काळजी आहे तर मग तिथे रोमँटिक गाण्याचं शुटिंग का केलं?, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. 

अमोल कोल्हे यांनी टीका करणाऱ्यांना उगाच उथळपणे कमेंट करु नयेत असं आवाहनदेखील केलं आहे. उगाच वाद निर्माण करत संबंध जोडला जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गड किल्ल्यांवर रिसॉर्ट, हॉटेल उभारण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर महाराष्ट्रातील शिवप्रेमी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-