रायगड | जाहिराती बघून साबण, तेलाची निवड करा, नेत्याची नाही, अशी बोचरी टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचा शनिवारी रायगडावर समारोप झाला. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी शिवसेनेसह भाजपवर सडकून टीका केली.
महाडमध्ये आयोजित सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. यावेळी युती सरकारच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारला टार्गेट केले.
बाप सरदार असला म्हणून त्याचा मुलगा सरदार व्हायला पाहिजे, असं काही नसतं, काळाच्या पुण्याईवर आजचा दिवस स्वराज्यात उगवत नव्हता. त्या छत्रपतींची ही भूमी आहे, अशा खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर घणाघाती टीका केली.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आपल्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, अदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला.
सर्व पातळीवर हे सरकार अपयशी ठरले आहे. आता न केलेल्या जाहिराती दाखवून हे सरकार दिशाभूल करत आहे. त्यामुळे नेत्याची निवड करताना जरा काळजी घ्या नाही, असं आवाहन कोल्हे यांनी मतदारांना केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
काँग्रेसच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांची दोन्ही मुले काँग्रेसच्या पहिल्या यादीत? – https://t.co/zEhJSO6dfH @INCMaharashtra @NCPspeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019
वाघाची कुत्र्यासारखी अवस्था झालीये; धनंजय मुंडेंची शिवसेनेवर घणाघाती टीका https://t.co/MwpzrJEL0L @dhananjay_munde @Shivsena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ महत्वपूर्ण आवाहनhttps://t.co/zvqQ5M2CbE @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019