नवी दिल्ली | शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसृष्टीची उभारण्याची मागणी शिरुर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत केली. शून्यप्रहारामध्ये अमोल कोल्हेंनी लोकसभेत ही मागणी केली आहे.
लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी अमोल कोल्हे यांनी भक्ती-शक्ती कॅरिडॉर अंतर्गत किल्ले शिवनेरीवरती शिवसृष्टी उभारण्याचं आश्वासन दिलं होतं.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेले किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शिवसृष्टीची निर्मिती झाली तर विश्वातील संपूर्ण शिवभक्तांसाठी हे एक प्रेरणास्थळ असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगासाठी प्रेरणादायी आहे, असं अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.
आबाल-वृद्ध, माता-भगिनी यांना शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर जाण्यासाठी रोप-वेची निर्मिती करून द्यावी, अशीही आग्रही मागणी कोल्हेंनी संसदेत केली. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. त्यामुळे शिवनेरी किल्ला हा मराठीजनांसाठी स्फुर्तीस्थान असून जगभरातील शिवप्रेमींसाठी प्रेरणास्थान मानलं जातं.
https://www.facebook.com/Dr.AmolKolhe/videos/290027108567521/?v=290027108567521
महत्वाच्या बातम्या-
“मी नाराज असल्याची अफवा आहे” – https://t.co/jqtkHiWOfi @EknathKhadseBJP @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 11, 2019
“शिवसेना काँग्रेसच्या दबावाला झुकणार नाही अशी अपेक्षा” – https://t.co/6ASv6mlfoQ @Dev_Fadnavis @ShivSena @OfficeofUT @INCMaharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 11, 2019
“भाजप सरकारने गोपीनाथ मुंडेंचं स्मारक बांधलं नाही… ठाकरे सरकारने तरी ते करावं” –https://t.co/TG8IwmqCEV @EknathKhadseBJP @BJP4Maharashtra @OfficeofUT
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 11, 2019