मुंबई | सर्वोच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वीच बैलगाडा शर्यतीवरील सशर्त बंदी उठवली होती. परिणामी राज्यातील बैलगाडा प्रेमींना मोठा दिलासा मिळाला होता. त्यानंतर आता विविध ठिकाणी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात येत आहेत.
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर अधिकृतपणे पहिली बैलगाडा शर्यत सांगली जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्यातील अनेक भागात शर्यतीचं आयोजन करण्यात येत आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळातून निवडून आलेले खासदार अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करावी, यासाठी संसदेत आवाज उठवला होता. तर एका कार्यकर्मात त्यांनी बैलगाडा मालकांना त्यांनी शब्द देखील दिला होता.
बैलगाडा शर्यत सुरू झाल्यावर हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी म्होरं घोडी धरणार म्हणजे धरणार, असं कोल्हे म्हणाले होते. अशातच आता अमोल कोल्हे यांनी दिलेला शब्द पाळला आहे.
पुण्याच्या निमगाव दावडीत बैलगाडा घाटात अमोल कोल्हे यांनी घोडस्वारी केली आहे. कुलदैवत खंडोबाच्या चरणी नतमस्तक होऊन आज घाटात घोडी धरली व भंडाराही उधळला, असं कोल्हे म्हणाले आहेत.
जेव्हा तुमच्यावर प्रश्न उपस्थित केले जातात. तेव्हा महाराजांची शिकवण आहे भिंतीला पाठ लागल्यानंतर उसळायचं असतं, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
घोडेस्वारी पूर्ण केल्यानंतर अमोल कोल्हे यांनी दंड आणि मांड्या थोपटत आपला आनंद व्यक्त केलाय. त्यावेळी त्यांना आनंद मावेनासा झाला होता.
बैलगाडा मालक शेतकरी, शौकिनांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहणारा आनंदही आज पाहिला, अशा शब्दात त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
पाहा व्हिडीओ-
महत्वाच्या बातम्या –
“आमचे देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे”
‘संजय राऊत महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक, त्यांना….’; तुषार भोसले भडकले
‘मामी गप्प बसा….’; शिवसेनेच्या ‘या’ महिला नेत्याची अमृता फडणवीसांवर बोचरी टीका
प्रेस कॉन्फरन्समध्ये सोमय्यांनी प्रत्यक्ष हातात जोडे घेतले, म्हणाले, ‘मारा मला मी…’
“खुशाल चौकशी करा, मी मुलासह जेलमध्ये जाण्यास तयार, पण… “