महाराष्ट्र मुंबई

अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात ‘शिवस्वराज्य’ यात्रा; उदयनराजे असणार ‘स्टार कॅम्पेनर’!

मुंबई |  आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आणि पक्षाला सातत्याने पडत असलेलं भगदाड… हे दोन प्रमुख मुद्दे लक्षात घेता राष्ट्रवादीने भाजप-शिवसेनेला शह देण्यासाठी नवीन प्लॅन आखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेशी संवाद साधण्याकरिता ‘शिवस्वराज्य’ यात्रेचं आयोजन केलं आहे. 

शिवस्वराज्य यात्रेची धुरा खासदार अमोल कोल्हे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज आणि राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले स्टार कॅम्पेनर म्हणून या यात्रेत सहभागी होणार आहेत.

शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांनी विधानसभेचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन ‘जनआशीर्वाद’ यात्रा आयोजित केली होती. तर 1 ऑगस्ट पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘महाजनादेश यात्रा’ सुरू होणार आहे. सेना-भाजपला शह देण्यासाठी आणि प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीने ‘शिवस्वराज्य’ यात्रेचं आयोजन केलं आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मगाव असणाऱ्या जुन्नर तालुक्यातल्या शिवनेरीवरून 6 ऑगस्ट रोजी या यात्रेला सुरूवात होणार आहे. सुरूवातीच्या टप्प्यात 3 विधानसभा मतदारसंघात जाऊन ही रॅली लोकांशी संवाद साधेल.

यात्रेचा दुसरा टप्पा 16 ऑगस्ट पासून तुळजापूरमधून चालू होईल. तर यात्रेची सांगता स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडावर होईल. 

दरम्यान, या यात्रेची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“ओव्हरफ्लो झालेलं जहाज बुडतं हा नियम आहे… भाजपचं जहाज नक्की बुडणार”

-“तोंडातून फेस येईपर्यंत ज्यांच्यावर टीका केली… आज त्यांच्याच कळपात प्रवेश केला”

-आघाडीच्या नेत्यांना कसं फोडलं??? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गुपित रहस्य!

-मी गद्दार नाही…. पळून गेले नाही- चित्रा वाघ

-राष्ट्रवादीच्या या दिग्गज नेत्यांनी घेतला भाजपचा झेंडा हाती!

IMPIMP