शेवटचे भाग पाहून ढसाढसा रडलेल्या चिमुरड्या शंभुराजांची डॉ. अमोल कोल्हेंनी घेतली भेट

मुंबई | प्रथमत: ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि त्यापाठोपाठ ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात छत्रपती बाप लेकांचा इतिहास पोहचला आणि ते शिवधनुष्य लिलिया पेललं ते अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी….! ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेने तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मात्र ही मालिका आता अंतिम टप्प्यात आहे.  मालिका अगदी शेवटच्या टप्प्यात आली असताना मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेचा भाग टेलिकास्ट झाल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात हे हृदय हेलावून टाकणारं दृश्य पाहून पाणी आलं.

याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील छोट्या पाच वर्षाच्या बाल शंभूप्रेमीचा ढसाढसा रडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या चिमुकल्याचा शोध घेवून मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्वतः या चिमुकल्या शंभूप्रेमीला भेटीचे निमंत्रण पाठवलं होतं.

श्रीयोग माने असं या चिमुरड्या शंभूप्रेमीचं नाव आहे. तो मुळचा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातला राहणारा आहे. या चिमुकल्याची अमोल कोल्हे यांनी भेट घेतली. कोल्हे यांनी चिमुरड्या श्रीयोगची भेट घेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि बालशंभूचा ड्रेस आणि तलवार भेट दिली.

दुसीरकडे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतरचे भाग वगळावे, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली होती. मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांच्या छळाचा कोणताही भाग वगळणार असं कोणतही आश्वासन मी दिलं नाही. मालिकेत काय दाखवायचं आणि काय नाही याबाबत निर्माते नाही तर झी वाहिनी निर्णय घेते, असं अमोल कोल्हेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-देवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील

-“मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय??”

-“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”

-महाविकास आघाडीत शिजतंय तरी काय?? वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक

-CAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका