पवारसाहेबांना गोवण्याचा प्रयत्न दुर्दैवी आणि हीन दर्जाचा; अमोल कोल्हे संतापले

मुंबई |  प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवाणरी मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आता लवकरच निरोप घेणार आहे. मात्र डॉ. अमोल कोल्हे ही मालिका शरद पवार यांच्या दबावामुळे बंद करणार असल्याच्या अफवा सोशल माध्यमांवर चांगल्याच रंगल्या आहेत. या चर्चांवर डॉ. कोल्हे चांगलेच नाराज झाले आहेत.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेवरून शरद पवारांना गोवण्याचा प्रयत्न हा अत्यंत दुर्दैवी आणि हीन दर्जाचा असल्याचं डॉ. कोल्हे म्हणाले आहेत. आदरणीय साहेबांचा कलेविषयीचा दृष्टीकोन आपल्या सर्वांना माहिती आहे. मी राष्ट्रवादीत सक्रिय झाल्यापासून कधीही साहेबांनी मालिकेत हे दाखवा हे दाखवू नका, असं म्हटलेलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील चर्चे काहीही तथ्य नाही, असं कोल्हे म्हणाले.

गेले काही दिवस ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेसंदर्भात कोणतीही शहानिशा न करता कपोलकल्पित माहितीच्या आधारे सोशल मीडिया वर अफवा फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रेक्षक म्हणून आपल्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच पण मालिका अजून पूर्णत्वाला गेलेली नसताना अपप्रचार करणे योग्य नसल्याचं कोल्हेंनी म्हटलं आहे.

मालिकेसंदर्भात अफवेच्या अनेक पोस्ट फिरत आहेत. टीका करण्यासाठी सरसावलेल्या तथाकथित बोरूबहाद्दरांनी आणि मळमळ असह्य होऊन गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या सोशल मीडिया पंडितांनी मालिका पुर्ण पहावी. मग प्रेक्षक नात्याने टिप्पणी करावी, असं कोल्हेंनी आपल्या ट्विटमध्ये एख फोटो शेअर करत अफवा पसरावणाऱ्यांना सज्जड भाषेत चांगलाच दम भरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीच्या आग्रहानंतर शिवजयंतीच्या तारखेबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय!

-केजरीवालांचा ‘झाडू’ पुन्हा भाजपचा सुफडासाफ करणार; सर्व्हेचा अंदाज

-चाकणकर ही बावळट बाई; चित्रा वाघ यांना संताप अनावर

-“चित्रा वाघ, तुमचा पायगुणच…. जिकडं जाता तिकडं सत्तेवरून पायउतार व्हावं लागतंय”

-बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या; मोदींच्या जवळच्या मित्राची मागणी