“लस प्रमाणपत्रावर स्वतःचा फोटो छापता तर लोकांच्या मृत्यूची जबाबदारी देखील घ्या”

नवी दिल्ली | कोविड महामारी सुरू झाल्यापासून आज पहिल्यांदाच कोविड परिस्थितीवर लोकसभेत चर्चा होत आहे. विषयाच्या सुरुवातीलाच कोरोना लसीकरण आणि कोरोनाच्या मृत्यूवरून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणावर पंतप्रधान मोंदीचा फोटो असल्याचे दिसून येते. त्यामुळे केवळ लसीकरणाचे श्रेय घेत असाल तर मृत्यूंची जबाबदारीही घ्या, अशी टीका खासदार खासदार अमोल कोल्हेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.

लोकसभेतील (Loksabha) आजच्या चर्चेत खासदार अमोल कोल्हे यांनी कोरोना विरुद्धच्या लढ्याबाबत केंद्र सरकारने कशाप्रकारे कामगिरी करणं आवश्यक आहे, याबद्दल स्पष्ट केलं.

कोल्हेंनी यावेळी कोणत्याही युद्धात काही नियम असतात ज्यांनी युद्ध जिंकता येतं असं सांगतिलं आहे. यावेळी युद्धाचे सेनापती अर्थात पंतप्रधान मोदी यांनी सर्व संकटात पुढे उभे राहून सामना करणं आवश्य़क असल्याचं म्हटलं आहे. यावेळी मृत्यूसारख्या गोष्टींची जबाबदारी घेऊन उपाययोजना करण्यावरही भर द्यावा असंही म्हटलं आहे.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Shiv Sena Vinayak Raut) यांनी केंद्र सरकारवर घणाघात केला आणि आरोप केला केला की महाराष्ट्राला एकूण पुरविण्यात आलेल्या व्हेंटिलेटरपैकी 60 टक्के व्हेंटिलेटर (ventilators unoperational) हे खराब होतं.

महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात कोविडची परिस्थिती अत्यंत गंभीर असताना पीएम केअर (PM Cares) अंतर्गत राज्यांना व्हेंटिलेटरचे वाटप करण्यात आले होते. पण महाराष्ट्रात जे हजारो व्हेंटिलेटर पुरवण्यात आले होतेस त्यापैकी 60 टक्के व्हेंटिलेटर कामच करत नव्हते, असा आरोप विनायक राऊत यांनी केला. याबाबत चौकशी करण्याची मागणीही राऊत यांनी संसदेत केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; मराठी चित्रपटासाठी गायलेलं गाणं लवकरच येणार 

देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; केंद्र सरकारचं मोठं वक्तव्य

9 रुपयांचा शेअर 8 महिन्यात 650 रुपयांना, लाखाचे झाले असते 72 लाख 

 मोदींची स्तुती करणं विद्यार्थ्यांला पडलं महागात; विद्यापीठाने केलं असं काही की…

पोस्टाची बंपर योजना; लेकीच्या 18 व्या वर्षी मिळतील ‘इतके’ लाख