पुणे महाराष्ट्र

उदयनराजेंना ‘शिवस्वराज्य यात्रे’ची कल्पनाच नाही???

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी गळती लागली असताना जनाधार टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने ‘जुन्नर ते सिंदखेडराजा’ अशी ‘शिवस्वराज्य यात्रा’ जाहीर केला आहे.

शिवस्वराज्य यात्रेची सूत्रे शिरुरचे खासदार यांच्या हाती देण्यात आली आहे. तर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचं ‘स्टार कँम्पेनर’ म्हणून नाव जाहीर केलं आहे.

शिवस्वराज्य यात्रेच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर झळकत आहेत. मात्र या यात्रेविषयी स्वत: उदयनराजेंनाच माहिती नसल्याची माहिती समोर आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज म्हणून त्यांच्याविषयी सगळीकडे आदराची भावना आहे. असं असताना त्यांना यात्रा काढायची असती तर ते स्वत: काढतील. ते कँम्पेनर म्हणून का जातील, असं समर्थकांचं म्हणणं आहे.

महत्वाची बाब म्हणजे त्यांना यात्रा काढायची आहे आणि त्याचं कँम्पेनही करायचं आहे. असं राष्ट्रवादीमधील कोणीही उदयनराजेंना सांगितलेलं नाही, असंही सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…तर काट्याने काटा काढावा लागेल; शिवेंद्रराजेंचं खुलं आव्हान

-…म्हणून मी राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपात आलो- आमदार शिवेंद्रराजे भोसले

…तर फडणवीस साहेब, तुम्हाला तुमची यात्रा पुढे नेण्याचे धाडसही होणार नाही!

-विजय वडेट्टीवार यांचा शिवसेनेबाबत मोठा गौप्यस्फोट! राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ

-जितेंद्र आव्हाडांच्या बोचऱ्या टीकेला शिवेंद्रराजेंचं खरमरीत प्रत्युत्तर!

IMPIMP