…तोपर्यंत फेटा बांधणार नाही; खासदार अमोल कोल्हेेंचा निर्धार

बीड | परळी आणि केज मतदारसंघात जोपर्यंत आमचे आमदार निवडून येत नाहीत तोपर्यंत फेटा बांधणार नाही. जेव्हा आमदार निवडून येतील त्यावेळी या व्यासपीठावर येऊन फेटा बांधेन, असा निर्धार शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे.

मराठवाड्यातील युवा म्हणजे धगधगता अंगार आहे. या तरुणाईला सावध करण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आहे, अशा शब्दात अमोल कोल्हेंनी तरुणांना जागं होण्यास सांगितलं आहे. ते आंबेजोगाईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत बोलत होते.

विधानसभेसाठी परळी मतदारसंघात भाजपच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची लढत त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासोबत आहे. पंकजा मुंडे 2009 पासून परळीत आमदार आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात होणारी लढत अटीतटीची ठरणार आहे.

धनंजय मुंडे जोपर्यंत पंकजा मुंडे यांना पराभूत करुन आमदारकी मिळवत नाहीत, तोपर्यंत डॉ. अमोल कोल्हे फेटा बांधणार नाहीत, असंच दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-