‘छपाक’ चित्रपटावर बहिष्कार टाकणे दुर्दैवी- अमोल कोल्हे

अमरावती | बाॅलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणने JNU च्या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात यावा अशी मागणी काहींनी केली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

दीपिका पादुकोणने JNU च्या विद्यार्थ्यांची भेट घेतल्यामुळे काही संघटनांनी तिच्या चित्रपटाविरोधात मोहीम उघडली आहे. पण, एखादा कलाकार एखाद्या सरकारच्या नीतीविरोधात बोलतो तेव्हा त्याच्या विचारांचा सन्मान झाला पाहिजे, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी दीपिकाची पाठराखण केली आहे.

दीपिका पादुकोणने जी भूमिका घेतली ती कलाकार म्हणून की एक व्यक्ती म्हणून एवढंही आपल्याला कळत नसेल तर येथून पुढे कोणताही कलाकार बोलण्यास तयार होणार नाही, अशी भावनाही अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, अमरावती इथं 9 जानेवारीला शिवपुत्र संभाजी महानाट्याची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.  यावेळी कोल्हे बोलत होते.

महत्वाच्या बातम्या –