आयुष्यभराची शिदोरी दिली म्हणत ‘संभाजी’ मालिका संपताना अमोल कोल्हे भावूक

मुंबई | ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास रूपेरी पडद्यावर आणण्याचं काम अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी केलं. संभाजी महाराजांचा संपुर्ण जीवनप्रवास या मालिकेतून मांडण्याचा प्रयत्न कोल्हे यांनी केला. आता मालिका संपत आली असताना अमोल कोल्हे यांनी एक खास व्हिडीओ ट्विट करत एक प्रवास कधीच न विसरता येणारा……, असं कॅप्शन दिलं आहे.

सुरू झालेला प्रत्येक प्रवास कधीना कधी संपणार हे निश्चितच असतं. काही प्रवास मात्र खुप काही देऊन जातात. खुप काही शिकवतात. कर्तव्यपुर्तीची अनुभुती आणि स्वप्नपूर्तीचा अनुभव देतात. असाच एक प्रवास काळजाच्या कप्यात जपून ठेवण्यासारखा छत्रपती संभाजी महाराजांची गाथा…….. स्वराज्यरक्षक संभाजी, असं व्हिडीओमध्ये अमोल कोल्हे बोलत आहेत.

याआधी कोल्हें यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेत भूमिका बजावली होती. त्यानंतर कोल्हेंनी संभाजी महाराजांची भूमिका साकारताना आपल्या शरीरयष्टीत बदल करत शिवधनुष्य पेललं.

अमोल कोल्हे संभाजी महाराजांच्या मालिकेतून घराघरात पोहचले. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे खासदारकीसाठी तिकीट देण्यात आलं. त्यांनी शिरूरच्या शिवाजी आढळराव पाटील यांचा अनपेक्षित असा पराभव केला.

दरम्यान, कोल्हेंनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील शंभू राजांची भूमिका साकारत संभाजी महाराजांचे मुर्तीमंत दर्शन घडवलं, अशा प्रतिक्रिया लोकांमधून येत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या- 

-“सरकारकडे अर्थ नसला तरी शब्दरत्न बक्कळ आहेत; मोदी सरकारचा अर्थसंकल्प पोकळ”

-“आता वाटतंय, शेवटपर्यंत मौन धारण करावं; आण्णा हजारेंनी केल्या सरकार विरोधी भावना व्यक्त”

-विश्वसुंदरी पेक्षा वृक्षसुंदरी असावी- सयाजी शिंदे

-‘अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का?’;मुख्यमंत्र्यांवर टीका करताना शेलारांचा सुटला तोल

-“माफी मागा नाहीतर 23 कोटी रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेन”