गोडसेच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण, म्हणाले “एक कलाकार म्हणून…”

मुंबई | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेवर ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट प्रसिद्ध होणार आहे. राष्ट्रवादी खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे या चित्रपटात गोडसेची भूमिका साकारणार आहेत.

अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचा आता सर्वच क्षेत्रातून विरोध होताना दिसत आहे. तर काहींनी या भूमिकेवरून अमोल कोल्हे यांचं कौतुक देखील केलं आहे.

खुद्द राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त केली आहे. अशातच आता अमोल कोल्हे यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे.

एक कलाकार म्हणून आपण जी भूमिका साकारतो. त्यातील प्रत्येक भूमिकेशी आपली सहमती असते असं नाही, असं कोल्हे म्हणाले आहेत.

काही घटनांना 100 टक्के वैचारिक सहमती असते तर काही भूमिकांना सहमती नसते ही साधी सोपी गोष्ट आहे. 2017 साली ज्या चित्रपटात काम केलं तो आता रिलीज होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

मी नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणाची भूमिका मी कधीच घेतली नाही. मी या सिनेमामध्ये काम केलं आहे, असंही ते म्हणाले.

या सिनेमात काम केलंय हे लपवण्याची काहीही गरज नाही, असं मला प्रामाणिकपणाने वाटतं, असंही ते म्हणाले आहेत.

एक व्यक्ती म्हणून मला वैचारिक स्वातंत्र्य आहे. एक कलाकार म्हणून मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या दोन्हीमध्ये गफलत करू नये, असंही कोल्हे यावेळी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“हत्तीच्या येणाऱ्या बाळाचं नाव ‘चंपा’ आणि माकडाच्या बाळाचं नाव ‘चिवा’ ठेवू”

 प्रज्ञा सिंग ठाकूर म्हणतात, “दारू म्हणजे औषध, आयुर्वेदात…”

अमोल कोल्हेंच्या भूमिकेवर आव्हाड नाराज म्हणाले, “कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही…”

आता इन्स्टाग्राम यूझर्संना देणार पैसे, जाणून घ्या कशी कराल चांगली कमाई

 मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज! दारु झाली स्वस्त, शिवाय ‘हा’ नावडता नियमही बदलला!