मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार यासंदर्भात दोन मतप्रवाह आहेत. आता यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि मनसे नेते अमेय खोपकर यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे.
अमेय खोपकर यांनी अमोल मिटकरी यांचं नाव न घेता राष्ट्रवादीच्या आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत, असं म्हटलंय. तर, अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करुन खोपकर यांना प्रत्युत्तर दिलंय.
माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही, असं प्रत्युत्तर अमोल मिटकरींनी दिलंय. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
दरम्यान, तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जातेय. सगळीकडे शिवजयंतीचा उत्साह आहे. अश्यात आता राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी विरूद्ध शिवसेना-मनसे असा वाद निर्माण झालाय.
आमदार अमोल मिटकरी यांनी शिवजयंती तारखेनुसार साजरी व्हावी, असं म्हटलंय. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे राजकारण आहे, असंही मिटकरी म्हणालेत.
मिटकरी फालतू राजकारण करू नका. तुम्हाला नेहमीच फालतू राजकारण करायची सवय आहे. प्रसिद्धीसाठी काहीही बडबड करता. अक्कल आहे का तुम्हाला? कुठल्या गोष्टीचं राजकारण करता, याची लाज वाटली पाहिजे तुम्हाला, असं अमेय खोपकर म्हणाले होते.
माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे l
कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही ll— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 22, 2022
महत्त्वाच्या बातम्या-
“राष्ट्रवादीच्या फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजे”
पेट्रोल डिझेलनंतर गॅस दरवाढीचा भडका; आता सिलेंडरसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
संस्कार, संस्कृती, सन्मान…; 125 वर्षीय स्वामी शिवानंदांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदीही नतमस्तक
‘वहिनीसाहेबांचा आग्रह आहे तर…’; संजय राऊतांचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर
मोठी बातमी! सर्वसामान्यांना महागाईचा झटका, पेट्रोल-डिझेल महागलं