“भाजपची लावारीस कार्टी धमक्या देण्याशिवाय काही करू शकत नाही”

सांगली | राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची इस्लामपूर येथील जाहीर सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी जोरदार भाषण करून भाजपवर एकच हल्लाबोल केला.

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी यावेळी बोलताना भाजपसह मनसेवर सडकून टीका केली आहे. मिटकरींनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीतच भाषण करताना, राज ठाकरेंचा उल्लेख खाज ठाकरे असा केला आहे.

आपण कुणाला घाबरत नाही, त्यांची आणि भाजपची लावारीस कार्टी धमक्या देण्याशिवाय काही करू शकत नाही, असं म्हणत मनसेच्या ट्रोलर्संनाही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मनसेचा 5 रंगाचा झेंडा आता एका रंगावर आलाय. त्यावर राजमुद्रा आहे, पण त्यांच्याच पक्षाच्या एकाला मी राजमुद्रा विचारली, तर आम्हाला नाही विचारायचं असं त्यांनी म्हटल्याही अमोल मिटकरींनी सांगितलं.

भाजपची बी टीम एमआयएम आम्ही ऐकलं होतं, आता भाजपची सी टीम आली आहे. राज ठाकरेंनी अगोदर मराठीचा मुद्दा उपस्थित केला. त्यासाठी, शिवाजी महाराजांचा मुद्दा उपस्थित केला, असं ते म्हणालेत.

दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांनीही यावेळी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. पूर्वी रामदास पाध्याय यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरू आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरू आहे, असं म्हणत धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांनी राज ठाकरे (Raj Thackery) यांची अर्धवटराव म्हणून खिल्ली उडवली.

महत्त्वाच्या बातम्या- 

“PoK आपल्या बापाचंय, भागवतांनी तिथे संघाची शाखा सुरू करावी” 

राज्यातील ‘या’ भागांना अवकाळी पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज 

“माझ्या सर्व मित्रांना माझ्यापेक्षा जास्त माझी आईच आवडते” 

“…आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरू आहे” 

गुणरत्न सदावर्तेंबाबत सरकारी वकीलांचा मोठा खुलासा!