“लगान टीमनेच इंग्रजांना पळवून लावलेलं, महाराष्ट्रातील इंग्रज सत्तेबाहेर आहेत तेही लगान टीममुळेच”

मुंबई | सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. महाविकास आघाडीला जोरदार झटका देत भाजपने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत आपलं वर्चस्व स्थापन केलं.

सिंधुदुर्गातील विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वास देखील नारायण राणेंनी व्यक्त केला.

आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे. लगानची टीम नको आहे आम्हाला, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली होती. नारायण राणेंच्या या टीकेला महाविकास आघाडीकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नारायण राणेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपला लगानमधील इंग्रजांची उपमा देत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

लगानची टीमच शेवटी विजयी होते आणि देशद्रोही इंग्रजांना पळवून लावते, असा खोचक टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. महाविकास आघाडीचा लगानची टीम असा उल्लेख केल्याने अमोल मिटकरींनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्रातील इंग्रज सत्तेबाहेर आहेत ते लगान टीममुळेच, असा घणाघात देखील अमोल मिटकरींनी केला आहे.

सिंधुदुर्गातील निकालापूर्वी भाजपच्या मुंबई कार्यालयाशेजारी पोस्टरबाजी करण्यात आली होती. भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या पोस्टरबाजीवरूनही नारायण राणेंनी टीका केली होती.

हे फक्त पोस्टरबाजी करण्याच्या लायकीचे आहेत, राज्यात कारभार करण्याच्या लायकीचे नाहीत, अशी टीका नारायण राणेंनी केली होती. त्यानंतर राणेंनी महाविकास आघाडीची तुलना लगानच्या टीमशी केली होती.

नारायण राणेंच्या या टीकेला अमोल मिटकरींनी ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

‘…तर कठोर निर्णय घ्यावा लागेल’; अजित पवारांनी दिले मोठे संकेत

‘कोरोनाच्या आणखी अनेक लाटा येतील, कारण…’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

सावधान! Omicron रुग्णांमध्ये आढळली ‘ही’ दोन नवीन लक्षणं, दिसताच ताबडतोब डॉक्टरांकडे जा

“आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे, लगानची टीम नकोय”

धक्कादायक! आता आणखी एका व्हायरसचा धुमाकूळ, ‘या’ ठिकाणी सापडला पहिला रुग्ण