“फडणवीसांचं हे ट्विट म्हणजे मुह मे राम और बगल मे छुरी”

मुंबई | काल (दि. 29 जुलै) जागतिक व्याघ्र दिन (International Tiger Day) साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ट्विट करत वाघांची सुरक्षा करणे, ही काळाची गरज आहे, असे म्हटले होते.

त्यांच्या या ट्विटवर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी टीका करत त्यांची खिल्ली उडविली आहे. फडणवीस यांचे हे ट्विट म्हणजे “आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी” अशा आशयाचे असल्याचे त्यांनी म्हटले.

मुंबईतील मेट्रोच्या कारशेडसाठी (Mumbai Metro Car shed) आरेचे जंगल (Aarey Forest) तोडण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या (MVA) काळात हा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळी पर्यावरणप्रेमी आणि अनेक पर्यावरणवादींनी (Environmentalist) सरकारला हे मेट्रोचे कारशेड अभयारण्य न तोडता दुसरीकडे हलविण्याचे आव्हान केले होते.

त्यावेळी जनतेच्या मागणीला दाद देत, हे कारशेड कांजूरमार्गला (Kanjur Marg) हलविण्याचा निर्णय मविआ सरकारने घेतला होता. परंतु मविआ सरकार पडल्यानंतर शिंदे सरकारने हा निर्णय मागे घेत आरे जंगल तोडूनच कारशेड बांधण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी देखील केली.

त्यावरुन शिंदे सरकारच्या आरे कारशेड (Aarey Car Shed) प्रकल्पाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) याचिका दाखल आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. काल झालेल्या जागतिक व्याघ्र दिनानिमित्त देवेंद्र फडणवीसांनी एक ट्विट केले होते. त्याच्यावर टीका करत मिटकरींनी फडणवीसांवर निशाणा साधला.

उपमुख्यमंत्र्यांनी वाघाचे संवर्धन झाले पाहिजे, असे ट्विट केले होते. त्यांचे हे ट्विट म्हणजे ‘मुह मे राम और बगल मे छुरी’ स्वरुपाचे आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी मेट्रो कारशेड आरेत करण्याचा निर्णय घेतला. आरे म्हणजे मुंबईचा ऑक्सिजन आहे, असे मिटकरी म्हणाले.

आरे जंगलात पट्टेदार वाघ आणि बिबट्यांचा समावेश असतो. अशा जंगलावर कुऱ्हाड चालविण्याचे काम देवेंद्र फडणवीस करत आहेत, आणि दुसरीकडे व्याघ्र दिनाच्या शुभेच्छा देत वाघांच्या संवर्धनाचे आवाहन करत आहेत. त्यांचे हे वागणे दुटप्पीपणाचे आहे, असे मिटकरी म्हणाले.

तसेच त्यांची वाघांविषयीची ही भूमिका म्हणजे, आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी असा आहे, अशी कडक शब्दात अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

“बाळासाहेबांच्या पोटी आलात म्हणजे काही राजा झालात का?” 

‘उद्धव ठाकरे दोन वेळा घरातून पळून गेले होते’, नारायण राणेंचा गौप्यस्फोट

“काय ते प्रश्न.. काय ती उत्तरं.. काय तो घरगुती कार्यक्रम.. एकदम ओक्के”

“उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच आहे”

“तुमच्यात कर्तृत्व नाहीये, तुम्ही मर्द नाहीत, शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका”