कहे दो फडणवीस से, माना की तू शेर है अपनी जंगल का…; मिटकरींचा भाजप-सेनेवर घणाघात

माळशिरस |  कहे दो फडणवीस से, माना की तू शेर है अपनी जंगल का… लेकिन हम ओ शिकारी हैं जो तेरी ही गली में आके ठोक देंगे… अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ललकारलं. 

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज माळशिरसमध्ये पोहचली. यावेळी मिटकरींनी धुव्वाधार भाषण करत विविध किश्शे आणि शेरोशायरी आपल्या भाषणात पेरत उपस्थितांची मने जिंकली. इतिहासाचे दाखले देत  शिवाजी महारांजांनी देखील देखील मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन शिवस्वराज्य उभं केलं. आज आपल्यातील लोकं सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. करू देत त्यांना प्रवेश… आपण मावळे आहोत. आपण येत्या निवडणुकीत विधानसभेवर राष्ट्रवादीच्या झेंड्याबरोबर भगवा फडकवूया आणि शिवस्वराज्य आणुया, असं मिटकरी म्हणाले.

भाजप-सेनेने कायम जातीयवादाचं आणि फोडाफोडीचं राजकारण केलं पण आता आपण अपेक्षा करूया ईडापिडा टळो आणि आघाडीच्या माध्यमातून बळीचं राज्य येवो. त्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या जोमाने कामाला लागावं, असं आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केलं.

नेते जरी गेले असले तरी सामान्य कार्यकर्ता आजही पवार साहेबांच्या विचारांवरती काम करतो आहे आणि उद्याही करत राहिल. त्यामुळे काळजी नसावी…. शिवस्वराज्य येणार, असा विश्वास मिटकरींनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-