शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मिटकरींचा खळबळजनक आरोप, म्हणाले…

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला. आता या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खळबळजनक आरोप केला आहे.

अमोल मिटकरींनी या प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला आहे. सिल्व्हर ओक हल्ल्याचा मास्टरमाइंड हा नागपुरचा आहे आणि लवकरच ते नाव समोर येईल असं मिटकरींनी म्हटलंय.

सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की, हल्ल्याच्या दिवशी दोन फोन कॉल हे नागपूरहून आले होते, त्यावरून मास्टरमाइंड हा नागपूरचाच असल्याचे स्पष्ट होतं, असं मिटकरी यांनी म्हटलंय. तर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या दोषी नसते तर ते पळून गेले नसते, असं देखील मिटकरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एसटी महामंडाळाचं राज्य शासनात विलीनीकरण करावं या मागणीसाठी आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी धडक दिली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून चप्पलफेल करण्यात आली, तसेच संपकरी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली.

यावेळी मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या महिलांनी आपल्या हातील बांगड्या वाजवून सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलीसही घटनास्थळी दाखल झालेत.

कर्मचाऱ्यांनी थेट ‘सिल्व्हर ओक’समोर ठिय्या मांडण्याची भूमिका घेतली. त्यामुळे एसटी कर्मचारी आणि पोलीस प्रशासनामध्ये संघर्षही झाल्याचं पाहायला मिळालं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय ब्राह्मण असतात” 

नोकरीची सुवर्णसंधी! ‘ही’ प्रसिद्ध IT कंपनी देणार तब्बल 60 हजार जणांना नोकरी 

ICICI बँकेच्या ग्राहकांना झटका देणारी बातमी समोर

“दुसऱ्यांवर बोटं दाखवून हातोडे घेऊन फिरत होता, आता हा…” 

“अनिल देशमुख, आणि नवाब मलिक यांच्या कोठडीशेजारी सोमय्या राहणार”