मुंबई | राजर्षी शाहू महाराज यांचा आज स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराजांना आदरांजली वाहणारी पोस्ट केली. मात्र फडणवीसांनी संबंधित पोस्टमध्ये शाहू महाराजांना कार्यकर्ते म्हणून संबोधलं होतं. यावरून फडणवीसांवर टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
फडणवीसजी ज्यांना तुम्ही कार्यकर्ते म्हणुन संबोधलं त्या शाहुराजांनी जसे तोफा वितळवुन नांगर बनवले होते हा इतिहास आहे, तसेच महाराष्ट्राने सुद्धा तुमचा माज उतरवुन तुम्हाला केव्हाच भंगार बनवलं आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी फडणवीसांवर केली आहे. तसेच फडणवीसांनी माफी मागावी, अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे.
साधी स्माईलीची कमेंट पडली की त्रास होणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी जेंव्हा शाहु महाराजांना कार्यकर्ता म्हणुन संबोधलं तेव्हा जिवंत मनात एक आगडोंब नक्कीच उसळला. अजूनही पिढ्यानपिढ्या तुमचा हा निचपणा सुरूच असेल तर फडणवीसांना जाब विचारलाच पाहिजे, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
माफीनामा मागणाऱ्यांच्या पिढ्यांनी शाहुराजांच्या पिढीला डिवचलं तर काय फळं भोगावी लागतात हे आपल्या 105 कार्यकर्त्यांना विचारून सांगा. तुमच्या या प्रवृत्तीचा निषेध, असंही मिटकरी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-राज्यात अडकलेल्या लोकांना गावी सोडण्यासाठी एसटी सेवा देणार- विजय वडेट्टिवार
-’17 मेनंतर काय करणार?’; सोनिया गांधींचा केंद्र सरकारमोफतला सवाल
-…म्हणून चंद्रकांत पाटलांचा लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्रीला विरोध
-धक्कादायक! एका दिवसात 38 पोलिसांना कोरोनाची लागण
-आणखी बळी जातील पण अर्थव्यवस्थेला चालना देणं महत्वाचं- डोनाल्ड ट्रम्प