महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल; अमोल मिटकरी यांचे खळबळजनक भाकीत

मुंबई | राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयात शिवसेना (Shivsena) विरुद्ध शिंदे (Eknath Shinde Group of MLA) गटाच्या पाच वेगवेगळ्या याचिया न्यायप्रविष्ठ आहेत.

त्यामुळे शिंदे सरकार अस्थिर आहे. त्यांना कायद्याचा पूर्ण पाठिंबा मिळाला नाही आहे. तसेच शिवसेनेला देखील न्यायालयाच्या (Supreme Court of India) निर्णायाची प्रतीक्षा आणि आशा आहे.

यातच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एक वक्तव्य केले आहे. त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार असल्याचे भाकीत  केले आहे. ते बोदवड येथे एका संवाद यात्रेत बोलत होते.

शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या याचिकांवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट (President Rule) लागू होईल, असे मिटकरी म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपवर देखील टीका केली.

अधिवेशनाच्यावेळी आम्ही विधीमंडळाच्या पायऱ्यावर 50 खोके एकदम ओके अश्या घोषणा दिल्या, तर एवढा राग का आला? लहान मुले सुद्धा पन्नास खोके, एकदम ओके असे म्हणतात.

तसेच त्या खोक्यांमध्ये बिस्किट, इंजेक्शन असू शकते, असे मिटकरी म्हणाले. शिंदे गटाचे आमदार म्हणतात आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर शिंगावर घेऊ. मग आता आम्ही बैलांच्या पाठीवर 50 खोके एकदम ओके लिहीले, असे मिटकरी म्हणाले.

यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांची खिल्ली उडवली. प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) जेलमध्ये जातील, असे सोमय्या म्हणाले होते. पण ते तर शिंदे गटात गेले, असे मिटकरी म्हणाले.

यशवंत जाधव (Yashwant Jadhav) देखील भाजपमध्ये गेले. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (Bhawan Gawali) यांनी तर शिवबंधन काढून नरेंद्र मोदींना राखी बांधली, अशी टीका यावेळी अमोल मिटकरी यांनी केली.

महत्वाच्या बातम्या – 

गणेश भक्तांसाठी खुशखबर! मुख्यमंत्र्यांनी दिले नवे आदेश

“आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे!” – मनसेचे संदीप देशपांडे

वैज्ञानिकांना लागला दुसऱ्या पृथ्वीचा शोध?

देवेंद्र फडणवीसांच्या “विनाशकाले विपरीत बुद्धिला” आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले…

‘संभाजीराजेंचं नेतृत्व नको’; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक