“सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली हे शोधणं महत्त्वाचं”

मुंबई | शरद पवार यांचं आडनाव आगलावे करा. कारण शरद पवारांनी आयुष्यभर काड्या लावायचं काम केलं आहे, अशी बोचरी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केली. यानंतर राष्ट्रवादीनेही सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आमदारकी जात असल्याने सदाभाऊंची अवस्था पाण्याविना मासोळी अशी झाली आहे. त्यामुळेच ते शरद पवारांवर टीका करत आहेत, असं म्हणत अमोल मिटकरींनी सदाभाऊ खोत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

शरद पवार साहेबांनी काय केलं. यापेक्षा सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली हे आधी शोधणं महत्त्वाचं आहे, असा हल्लाबोल अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे.

राज्यातील सर्व ऐतिहासिक पुतळ्याचं उद्घाटनं पवार साहेबांनी केलं. अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करून सदाभाऊ यांनी पाप केलंय. हे तीन पक्षाचं सरकार आहे, असं ते म्हणालेत.

भाजप एका पक्षाचं सरकार असतानाही कुजबूज होत होती. आता तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात काही निधी कमी मिळाला असेल म्हणून त्यांनी बोलून दाखवलं. एखाद्याच्या बोलण्याने महाविकास आघाडीत गोंधळ आहे असं होत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान,शरद पवार साहेब हे महान नेते आहेत. मात्र, त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीही केलं. शरद पवारांनी जाईल तिथे आग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचं काम केलंय, असं सदाभाऊ खोत म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीवर भाजपची काळी नजर” 

“शरद पवारांचं आडनाव आगलावे करा, त्यांनी आयुष्यभर काड्या लावायचं काम केलं” 

‘त्या डायरीतील भाजप नेत्यांची नावं जाहीर करा’; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 

पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबता थांबेना; सलग सहाव्यांदा ‘इतक्या’ रूपयांनी पेट्रोल महागलं 

“भारतातील हिंदू मुली मुस्लिम मुलांना घेऊन जातात, त्यामुळे…”