“भाजपचा पैसा घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा”

देगलूर | नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 30 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी लक्ष्मीपूजनाचा आधार घेत मतदारांना वादग्रस्त सल्ला दिला आहे. भाजपचा पैसा घ्या, पण मतदान कांग्रेसलाच करा, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

मतदानासाठी पैसा कोणाचाही घ्या, मात्र मतदान महाविकास आघाडीला करा. पंढरपूरमध्ये मतदारराजाकडून जी चूक घडली, माझी इथल्या मतदारांना विनंती आहे की, ही चूक घडू देऊ नका, असं अमोल मिटकरी म्हणाले.

तुमचं मत मीठ मिरची एवढे स्वस्त समजून या दलालांपुढे गहाण ठेवू नका. फटाके, फराळ घ्या. भाजपचा पैसा घ्यायचा पण महाविकास आघाडीला मतदान करायचं, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

देशभरात अनेक ठिकाणी पोटनिवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. यातच नांदेडमधील देगलूर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणुका होत आहेत.

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे.

महत्वाच्या बातम्या-

उद्धवसाहेब, एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?- क्रांती रेडकर

अजित पवारांना मोठा धक्का; ‘या’ जवळच्या व्यक्तीच्या घरी आयकर विभागाने टाकला छापा

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण!

“शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना लाज वाटायला हवी”

पेट्रोल-डिझेलचा दर वाढला, पाहा काय आहे आजचा दर