‘मोदीजी चूक दुरूस्त करा’, अमोल मिटकरी संतापले

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी न दिल्याने राजकीय वातावरण पेटलं आहे. अजित दादांना जाणीवपूर्वक डावललं गेल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात येत आहे.

पंतप्रधान मोदींनी देहूनगरीत सभेला संबोधलं. त्यापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. मात्र अजित पवारांना भाषणाची संधी मिळाली नाही.

अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पुण्याचे पालकमंत्री आहेत मात्र तरीही त्यांना देहूनगरीत भाषणाची संधी दिली गेली नाही. त्यामुळे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचा घणाघात खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

अजित पवारांवर अन्याय झाला असल्याचा आरोप देखील सुप्रिया सुळेंनी केला. आजच्या घटनेवरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी जर शासकीय प्रोटोकॉल पाळला नसेल आणि काही कारण नसताना देवेंद्र फडणवीस यांना बोलते करून स्वपक्षाचा प्रचार केला असेल तर तो संविधानिक पदाचा अपमान आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

मोदीजी चूक दुरूस्त करा, असा इशारा देखील अमोल मिटकरींनी मोदींना दिला आहे. पंतप्रधान मोदी एक सामान्य वारकरी म्हणून आले असतील तर भेदाभेद भ्रम अमंगळ या तुकोबारायांच्या अभंगाचा सोयीने विसर पडल्याचा टोला मिटकरींनी लगावला आहे.

भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने हा धार्मिक कार्यक्रम राजकीय करून टाकला, असा खोचक टोला देखील अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.

दरम्यान, अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत याचं भान तरी प्रधानमंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांना असायला हवं, असंही अमोल मिटकरी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! अभिनेत्री दीपिका पादुकोनची तब्येत बिघडली, रूग्णालयात दाखल

देहूत अजित पवारांना भाषणाची संधी नाही; सुप्रिया सुळे कडाडल्या, म्हणाल्या…

“पंकजा मुंडेंचा राजकीय एनकाऊंटर करण्याचा भाजपमधून प्रयत्न होतोय”

पंतप्रधान मोदी आणि अजित पवारांच्या विमानतळावरील ‘त्या’ फोटोची का होतेय चर्चा?

पालखी मार्गाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले…