मुंबई | विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने 11 दिवसांत जगभरात 200 कोटी रुपयांहून अधिक आणि देशभरात 160 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.
हा चित्रपट एकीकडे बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचतोय, तर दुसरीकडे याच चित्रपटावरून सोशल मीडियावर वादंग उठलंय.
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाचं कौतुक केलं आणि देशभर त्याच गोष्टीवरून सामाजिक आणि राजकीय मतभेदाचा वणवा पेटला.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विनोद कापरी यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटवरुन गुजरात फाइल्स चित्रपट बनवण्यास आपण तयार असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. आता यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काश्मीर फाईल्सपेक्षा गुजरात फाईल्स फार भयंकर आहे. मुजफ्फरनगरची दंगल असो, गोध्रा हत्याकांड असेल, सोहराबुद्दीन प्रकरण असेल, यांवरही चित्रपट निघायला हवा, माझी वारंवार मागणी आहे. माझी आर्थिक परिस्थिती असती, तर गुजरात फाईल्स चित्रपट मीच हाती घेतला असता, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं.
नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांनी या चित्रपटावर भाष्य केलं. त्यानंतर, भाजपच्या आमदारांनी हा चित्रपट मोफत दाखवायला सुरुवात केलीय. पण, तरीही लोकं हा चित्रपट पाहायला जात नाहीत. अतिशय बोरींग हा चित्रपट आहे, असं ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अजित पवारांनी सभागृहात उडवली प्रविण दरेकरांची खिल्ली, म्हणाले…
मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का; शूटिंग संपवून घरी येताच ‘या’ अभिनेत्याचा मृत्यू
“आम्ही सत्तेत बसवायचं आणि तुम्हीच आमच्यावर अन्याय करायचा”
लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर!
‘गरज सरो, वैद्य मरो’; संजय राऊत मोदी सरकारवर बरसले