मुंबई | राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी त्यांच्या दोन जिवलग मित्रांसाठी एक फेसबुक पोस्ट केली आहे. जीवनाच्या सारीपाठातुन तुम्ही सोडुन गेलात मात्र तुमच्या प्रेमाला अमोल मिटकरी कधीच विसरणार नाही, अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी त्यांच्या मित्रांप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
विवेक कोल्हे आणि तुषार दादा पुंडकर आज यांची खुप खुप आठवण येत आहे. साधारण 9 वर्षांपूर्वी अकोट मधील नंदिपेठ आणि सरस्वती शाळा इथूनच आपण दोघांनी मला सामाजिक आणि राजकीय प्रवाहात आणलं, असं अमोल मिटकरी यांनी सांगितलंय.
उद्या छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. उद्याच्या दिनी माझा जबाबदारी पुर्ण राजकारण प्रवेश. दादा आदरणीय पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक मोठी जबाबदारी दिली आणि या वळणावर एक शिवछत्रपती कडे नेणारा तर दुसरा संभाजी महाराजांकडे नेणारा असे दोन भाऊ जिवनात नसावेत ही कल्पना भयावह आहे, अशी भावूक पोस्ट मिटकरींनी केली आहे.
दरम्यान, आज वडिलांना जितकं आठवतोय तितकाच तुमच्या आठवणीत एकटाच स्वतःला सावरतोय, असंही त्यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
-…तर 105 आमदारांचे 50 व्हायला वेळ लागणार नाही; एकनाथ खडसेंचा पक्षनेतृत्वाला इशारा
-मोदींनी दिलेला आधार उद्योग क्षेत्र कधीही विसरणार नाही- नितीन गडकरी
-पंतप्रधान मोदींच्या आर्थिक पॅकेजनंतर शेअर बाजार उसळला…!
-“उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन शिथील करण्याची हिम्मत दाखवावी”
-मी पक्षाचं काम सुरू केलं तेव्हा ते चड्डीत मुतायचे- एकनाथ खडसे