“मला तर फार दु:ख झालं, पुढील दोन-तीन दिवस तर मी काही जेवणार नाही”

मुंबई | भाजपने आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. यात प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पक्षातील चर्चेतील नावांचा आणि सदाभाऊ खोत, विनायक मेटे या मित्रपक्षांच्या नेत्यांचाही पत्ता कट करण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून सदाभाऊ खोत आणि मेटे यांना विश्रांती देण्यात येणार असल्याचे बोललेही जात होते. अखेर आज उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी खोत आणि मेटे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

त्यांना राजकीय आत्महत्याच करावी लागलीय. भावी उत्तरायुष्यात त्यांचं आयुष्यमान वाढो. त्यांना चांगलं आरोग्य लाभो. लढत राहा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं म्हणत मिटकरींनी मेटे आणि खोत यांना टोला लगावलाय.

अशा वाटेवर तुम्हाला फडणवीस इतकं मोकाट सोडतील याची दुरान्वये कल्पना नव्हती. मला तर फार दु:ख झालं आहे. पुढील दोन-तीन दिवस तर मी काही जेवणार नाही. कारण मेटे आणि सदाभाऊ सभागृहात नसले तर सभागृह अगदी खाली झालं आहे, असं म्हणत मिटकरींनी दोघांना डिवचलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे कैवारी आता थांबलेत. नव्हे तर महाराष्ट्र थांबलाय. आगामी काळात महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम जे फडणवीसांनी थांबवलंय त्याचा हिशेब त्यांना चुकता करावा लागेल. खोत आणि मेटेंवर झालेला अन्याय महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“आता माझा नंबर असेल, कारण जो कोणी तुमच्या विरोधात बोलणार त्याला…” 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अतिविराट सभा पाहून टीका करणाऱ्यांची बुबूळं बाहेर आली असतील “ 

राज्यावर अस्मानी संकट; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार