मुंबई | एकनाथ शिंदेंनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंसह शिंदे गटातील बंडखोर आमदारांना मोठा दिलासा दिला.
12 जुलैपर्यंत बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. तर एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर 11 जुलै रोजी पुढची सुनावणी होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं.
यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 10 तारखेला असलेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरींनी तुफान टोलेबाजी केली आहे.
येत्या 10 तारखेला आषाढी एकादशी आहे. या दिवशी विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करतील, असा विश्वास अमोल मिटकरींनी व्यक्त केला आहे.
11 तारखेपर्यंत बंडखोर आमदारांनी गुवाहाटीत काय झाडी, डोंगर, हाटील पाहायचे ते पाहा, असा टोला देखील अमोल मिटकरींनी लगावला आहे.
महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेलं सत्तानाट्य बघता महाविकास आघाडी सरकार पडेल का, अशा चर्चा सुरू आहेत. त्यात यंदाची विठ्ठलाची महापूजा देवेंद्र फडणवीस करतील, असे बॅनर भाजप कार्यकर्त्यांकडून लावण्यात येत आहेत.
दरम्यान, या सर्व घडामोडींवरून अमोल मिटकरींनी बंडखोर आमदारांसह भाजपवरही निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा विजय म्हणजे…’, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण
मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा बंडखोर आमदारांना दिलासा
सर्वात मोठी बातमी! महाविकास आघाडी सरकार अल्पमतामध्ये, शिंदे गटानं काढला पाठिंबा
‘आमचं बाळ… लवकरच येणार’, आलिया भट्टने हॉस्पिटलमधला फोटो शेअर करत दिली गुड न्यूज