प्रेमविवाह न करण्याची शपथ घेणारी तरूणी झाली प्रियकरासोबत पसार!

अमरावती | अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना प्रेम, प्रेम विवाह आणि हुंडा घेऊन लग्न करणार नाही, अशी शपथ घेण्यास भाग पाडण्यात आलं होतं. त्यानंतर संबंधित शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आता मात्र यामध्ये अजून एक ट्विस्ट आला आहे.

महिला महाविद्यालयातील शिक्षकांचे निलंबन मागे घेण्यासाठी विद्यार्थिनी महाविद्यालयासमोर आंदोलन करत असताना प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ घेणारी विद्यार्थिनी प्रियकरासोबत पसार झाल्याची माहिती समजत आहे.

या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून एका युवकाने फूस लावून आपल्या मुलीला पळवून नेल्याची फिर्याद आईने दाखल केली आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, विद्यार्थिनींना शपथ दिल्यावर मीडिया आणि सोशल मीडियातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. मुलींपेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास नाही देणार, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपच्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांना बनवलं थेट पंतप्रधान, अन् सभागृहात पिकला हशा

तारक मेहताच मराठीचे ‘मारक’ मेहता; मनसेचं टीकास्र

-सोडून काँग्रेसचा हात, हार्दिक पटेल देणार का केजरीवालांना साथ?

-ज्यांना शक्य आहे, त्यांनी श्रीरामाच्या दर्शनासाठी या; देवदर्शनात राजकारण करू नका- उद्धव ठाकरे

-“सामनातील भाषा आपली पितृभाषा आहे; ‘सामना’ची भाषा आणि दिशा बदलणार नाही”