मुंबई | अमृता फडणवीस यांच्याकडून सतत ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे, त्याला शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
अमृता फडणवीस यांना वर्षा बंगला सोडावा लागला त्यामुळे नंतर त्या फ्रस्टेशनमध्ये गेल्याने तसे त्या बोलत आहेत, अशी टीका मनिषा कायंदे यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. त्यांनी जनतेत येऊन काम करावं, भाजपने त्यांना प्रवक्ता जाहीर करावं, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
मुंबईतील राणीच्या बागेत आणलेल्या पेंग्विनवरून आणि त्यावर होणाऱ्या खर्चावरून भाजपने महापालिकेतील (BMC) सत्ताधारी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे, त्याला शिवसेना (Shivsena) नेत्यांकडूनही उत्तर देण्यात येत आहेत.
शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच पेंग्विनच्या नाव ठेवण्यावरूनही महापौर आणि भाजपच्या नगरसेविकांमध्ये वाद रंगल्याचं दिसून आलं आहे.
मुंबईतील पेंग्विन सेक्शन आहे, तो मुंबई महानगरपालिका चालवते आणि अहमदाबाद महानगरपालिकेचे पेग्विन पार्क कंत्राटदार चालवत आहेत आणि तिथला प्रत्येक प्राणी पाहण्यासाठी वेगळी तिकीट आकारली जात आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
काही वेळापूर्वीच अमृता फडणवीस यांनी नामर्द, बिगडे नवाब आणि नन्हें पटोले म्हणत आघाडीतील नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यावरही आता जोरदार वाद पेटण्याची शक्यता आहे.
किरीट सोमय्या यांना मंत्री नवाब मलिक यांनी उपमा दिली आहे. याबद्दल मी बोलणार नाही, ते फक्त इंटरटेनमेंट करत आहेत. संजय राऊत यांच्यावर केलेले आरोप सिद्ध करावे, फुकटचे वायफळ आरोप करू नये, असंही त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या-
“मला सचिन तेंडूलकरची दया येते, त्याकाळी…”, रावडपिंडी एक्सप्रेसचं मोठं वक्तव्य
भय्यू महाराजांचे 12 तरुणींसोबत संबंध??? धक्कादायक वृत्त समोर
सेक्स स्कॅंडलमुळे चर्चेत राहिलेत ‘हे’ पाच दिग्गज क्रिकेटर, तेव्हा क्रिकेटही शर्मेनं झुकलं होतं
12वी पास झालेल्यांसाठी सुवर्णसंधी, मिळेल बंपर पगार
“संजय राऊत बावचळलेत, झिंग झिंग झिंगाट झालेत”