हातात लाटणं घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अमृता फडणवीस म्हणायच्या ‘हे’ गाणं

मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची जोडी प्रसिद्ध राजकीय जोडीपैकी आहे. अमृता फडणवीस आपल्या राजकीय वक्तव्यांसाठी राज्यात ओळखल्या जातात.

झी मराठी वाहिनीवरील किचन कल्लाकार हा शो सध्या प्रचंड गाजत आहे. विविध क्षेत्रातील दिग्गजांनी या शोमध्ये आपल्या अनुभवाची शिदोरी सोडली आहे.

अमृता फडणवीस यांनी या शोमध्ये हजेरी लावल्यानंतर मजेदार वक्तव्य केली आहेत. किचन कल्लाकार या शोमध्ये अमृता यांनी आपल्या घरातील किचनमधील किस्से सांगितले आहेत.

अमृता फडणवीस यांनी या शोमध्ये आपल्या वक्तव्यांनी धमाल उडवली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी देखील व्हिडीओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली.

अमृता फडणवीस यांना गायनाची प्रचंड आवड आहे. अमृता फडणवीस यांनी त्यांच्या गाण्यांवरून जोरदार ट्रोल देखील करण्यात आलं आहे. अशात आता परत एकदा किचन कल्लाकार या शोमधील वक्तव्यांवरून त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.

अमृता फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस यांच्या आवडत्या गाण्याबद्दल विचारण्यात आलं. संकर्षण कर्हाडे यानं देवेंद्र फडणवीसांच्या आवडत्या गाण्याबद्दल विचारलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

देवेंद्रजी मला नेहमी पिया अब तो आजा हे गाणं म्हणायला लावायचे. या गाण्यातील मोनिका ओ माय डार्लिंग हे कडवं ते म्हणायचे, तेव्हा मी त्यांना मोनिका नाही तर अमृता ओ माय डार्लिंग, असं म्हणायला लावायचे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

मी त्यांना हातात लाटणं घेऊन ते म्हणायला लावायचे असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. यानंतर आता मला काहीच विचारायचं नाही असं कर्हाडे हसत म्हणाला आहे.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या – 

तो बँजो वाजवत राहिला अन् शिकारी कोल्हा फक्त ऐकतच राहिला; तुफान शेअर होतोय व्हिडीओ

स्वप्न भंगलं अन् चौफेर फटकेबाजी करणारा MR 360 भर मैदानात ढसाढसा रडला!

किरीट सोमय्यांना अटक होणार?, संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

तरूणांना नोकरीची सुवर्णसंधी; ‘ही’ दिग्गज IT कंपनी देणार 55 हजार जणांना नोकरी

तुमची लाडकी Wagon R येतेय नव्या रूपात; जाणून घ्या फिचर्स