“जगाची चुकीची बाजू वर…”, अमृता फडणवीस यांचं नवं ट्विट चर्चेत

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

सोशल मीडियावर अनेकदा अमृता फडणवीस अॅक्टिव दिसतात. त्या नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करत असतात. या फोटोमधून कधी त्या राजकीय विषयावर भाष्य करताना दिसतात.

तर कधी सामाजिक विषयावर बोट ठेवतात. सामाजिक विषयांवर त्यांनी अनेकदा गाण्याच्या माध्यामातून किंवा ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अशातच अमृता फडणवीस यांचं आणखी एक ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. अमृता फडणवीस यांनी योगा करतानाचा एक फोटो शेअर केला आहे.

शेअर केलेल्या या फोटोमध्ये अमृता फडणवीस हिरवळीवर योगा करताना दिसत आहेत. या ट्विटला त्यांनी एक वैचारिक मथळा देखील लिहिला आहे.

‘जगाची चुकीची बाजू वर आहे. ते उलट्याबाजूने फिरवण्याची गरज आहे. असं केल्यास जगाची योग्य बाजू वर येईल’, असा मथळा दिला आहे.

इंग्रजीमध्ये हा मथळा लिहीला आहे. अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिक्रिया देखील देऊ लागले आहेत. त्यामुळे सध्या हे ट्विटरवर या ट्विटची एकच चर्चा होऊ लागली आहे.

पाहा ट्विट-


महत्वाच्या बातम्या – 

राज ठाकरेंना मोठा धक्का! न्यायालयाकडून अजामीनपात्र वाॅरंट जारी

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण

भीषण दुर्घटना! ‘या’ ठिकाणी गॅस गळतीमुळे 6 जणांचा मृत्यू

मोठी बातमी! आजपासून काही दिवस CNG राहणार बंद

“माझ्यासमोर पंतप्रधानही आले तरी मी माझी बोलायची भाषा बदलणार नाही”