मुंबई | काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या मोठ्या वादात अडकले आहेत. भंडारा येथील एका गावात कार्यकर्त्यांशी बोलताना नानांनी भाजपला चांगलंच फैलावर घेतलं होतं. त्यानंतर मोठा वाद उभा राहिला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याबद्दल नानांनी अयोग्य भाषेत टीका केल्याची तक्रार भाजपनं केली आहे. राज्यभरात भाजपच्या कार्यकर्त्यांना ठिकठिकाणी आंदोलनं केली आहेत.
गावकऱ्यांशी बोलताना नानांनी मोदींना मी मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर सर्वस्तरातून नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे.
नाना पटोले यांच्यावर सध्या भाजपच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी टीका करायला सुरूवात केली आहे. अशात आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या मैदानात उतरल्या आहेत.
राज्यातील प्रत्येक राजकीय मुद्द्यावर आपलं मत मांडणाऱ्या अमृता फडणवीस यांनी नानांवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुर्याची उपमा दिली आहे.
नरेंद्र मोदी यांच काम दाखवणारा एक व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी शेअर केला आहे. मोदींच्या कामाचं अमृता फडणवीस यांनी अनेकदा कौतूक केलं आहे. यावेळी त्यांनी टीका करताना एका हिंदी शायरीचा आधार घेतला आहे.
सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले !
पर इल्म नहीं है उन्हें के इस प्रगति की रोशनी को बुझाने की होड़ में,
खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले !
अमृता फडणवीस यांनी याअगोदरही राज्यातील महाविकास आघाडीवर टीका करताना अनेक काव्य पंक्तींचा उपयोग केला आहे. परिणामी सध्या अमृता फडणवीस यांचं हे ट्विट चर्चेत आहे.
दरम्यान, नाना पटोले यांनी मोदींवर टीका केल्यानं राज्यात मोठा वाद उभा राहीला आहे. नाना पटोलेंना अटक करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारवर दबाव वाढत आहे. परिणामी राज्यात तणाव निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“नानांनी तर हद्दच केली, मालकिणीचा सगळ्यात प्रामाणिक कुत्रा दाखवण्यासाठी…”
“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा अन् येरवड्यात दाखल व्हावं”
“शरद पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?”
‘इतना झूठ तो टेलिप्रॉम्प्टर भी सह न सका’; राहुल गांधींचा मोदींना टोला
नाना पटोलेंना अटक होणार?; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य