अमृता फडणवीस म्हणतात, “आज फिर एक बिल्लीने दहाड़ने की कोशिश की है…”

मुंबई | राज्याच्या राजकारणात नव्या वादाला सुरूवात करणारी पत्रकार परिषद शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवनात घेतली. त्यानंतर राज्यात मोठा संघर्ष सुरू झाला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून मोदी सरकार आम्हाला त्रास देत आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत यांच्या टीकेनंतर आता भाजपकडून राऊत यांच्या वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेण्यात येत आहे. अमृता फडणवीस यांनी राऊत यांच्यावर जोरादार टीका केली आहे.

आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या वादात आता अमृता फडणवीसांनी उडी घेतल्यानं नवा वाद उद्धवणार आहे.

भाजप नेत्यांना पुढील काही दिवसातच समजेल की शिवसेना काय करेल असंही पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले आहेत. परिणामी येणाऱ्या काळात राऊत आणखीन काय बोलणार याची उत्सूकता लागली आहे.

मला कितीही धमकी द्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारच राहणार आहे. हा फक्त ट्रेलर आहे, येणाऱ्या काळात आणखी कागदपत्रं आणि व्हिडिओ समोर येतील. उद्यापासुन महाराष्ट्राला कळेल जसजसा शोध लागेल तसतसे भाजपचं सत्य समोर आणणाप, असं थेट आव्हान संजय राऊतांनी दिलं आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर विविध मुद्द्यांना हात घालत टीका केली आहे. त्यानंतर भाजपकडून राज्यातील नेत्यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर टीका करायला सुरूवात केली आहे.

दरम्यान संजय राऊत यांच्याकडं कोणताच मुद्दा नाही आणि पुरावे नाहीत. त्यामुळेच नाशिक सह मुंबई बाहेरून लोक आणण्याची वेळ आली आहे. फक्त नेहमी प्रमाने गोंधळ केला आहे,असा टोला भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या – 

युक्रेन-रशिया संघर्ष टोकाला! हल्ला होण्याची भीती असताना रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा

“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”

“सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर…”; संजय राऊत यांचा भाजपला मोठा इशारा

“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”

‘शेती इकायची नसती वो, राखायची असती’; प्रविण तरडेंनी शेअर केला वडिलांसोबतचा व्हिडीओ