मुंबई| पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून राजकीय वर्तुळातील वातावरण तापलेलं दिसत आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी बदलीनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेले पहायला मिळाले. परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन ठाकरे सरकारवर नाव न घेता निशाणा साधला आहे.
अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. ‘बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?’, असा शेर अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे.
अमृता यांच्या ट्विटचा रोख मुख्यमंत्री यांच्याकडे असल्याचं दिसून येतंय. कारण, परमबीरसिंग यांच्या पत्राचे वृत्त माध्यमांत झळकताच त्यांनी हे ट्विट केलंय.
या पोस्टमधून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं असून मुख्यमंत्र्यांना वाचविण्यासाठी आणखी किती बळी जाणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. त्यानंतर, विरोधकांनी सरकारला आणि गृहमंत्र्यांना धारेवर धरलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही अतिशय धक्कादायक घटना असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा. या संपूर्ण आरोपींची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी व्हायला हवी. राज्य सरकारला केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणारी चौकशी मान्य नसल्यास न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले, परमबीर सिंग डीजी म्हणून कार्यरत आहेत. डीजी म्हणून काम करत असलेल्या अधिकाऱ्यानं केलेले आरोप गांभीर्यानं घ्यायला हवेत. याशिवाय परमबीर सिंग यांनी त्यांच्या आरोपात संभाषणदेखील जोडलं आहे. त्यामुळे या सगळ्या आरोपांचं गांभीर्य वाढतं. मुख्यमंत्री ठाकरेंनी अनेकदा दोषी असल्यासकारवाई करण्याची भाषा केली आहे. त्यांनी त्यांचे शब्द खरे करून दाखवावेत, असं फडणवीस यांनी पुढे म्हटलं आहे.
गेल्या 13 महिन्यांपासून परमबीर सिंग हे मुंबई आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत हाेते. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकं कार, त्यानंतर मनसुख हिरेन यांच्या कथित आत्महत्याप्रकरण यावरुन उठलेल्या गदारोळामुळे परमबीर सिंग अडचणीत आले आणि त्यांची उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांच्याकडे होमगार्डची जबाबदारी देण्यात आली.
बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी,
बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?#SachinWaze #SachinVaze #Target100Cr— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 20, 2021
महत्वाच्या बातम्या –
जाणून घ्या! केशर खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे
गुन्हेगाराकडून पोलिसाला बेदम मारहाण, कारण ऐकूण तुम्हालाही…
मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री…