अभिनेत्री अमृता खाणविलकरचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्यातील चाललेल्या घडामोडी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात.

तसेच अभिनेत्री त्यासंबंधीचे फोटो किंवा व्हिडीओही शेअर करत असतात. अशातच मराठी सिनेमासृष्टीसोबतच आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमधील चित्रपटांमध्येही काम करणारी अभिनेत्री अमृता खाणविलकरचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

अमृता सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती सतत फोटो किंवा व्हिडीओच्या माध्यामातून आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते. याचबरोबर ती कधीकधी इंस्टग्रामवर लाईव्ह येऊन चाहत्यांसोबत संवादही साधत असते.

अशातच तिने एक आपल्या इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ खूप क्यूट आहे. व्हिडीओमधील मुलगा दुसरा-तिसरा कोणी नसून तिची बहिण आदिती खानविलकरचा मुलगा असल्याचं समजतं आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये अमृताची बहिण आदिती आपल्या मुलाला टेडी बिअर हा शब्द कसा म्हणायचा हे शिकवतं आहे. हे शिकवताना ती खूप मज्जा करत असताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर तिचा भाचाही त्यासगळ्याचा आनंद घेत असल्याचं दिसून येत आहे.

त्या दोघांच्याही चेहऱ्यावर खूप हस्य असल्याचं पाहायला मिळतं आहे. आमृताने हा व्हिडीओ शेअर करताना या व्हिडीओला काय कॅप्शन द्यायचं असा प्रश्न विचारला आहे. यावर अनेक कलाकारांनी यामध्ये स्पृहा जोशी, सोनाली खरे यांनी तिला छानसं कॅप्शनही सुचवलं आहे.

हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, आतापर्यंत हा व्हिडीओ जवळजवळ 20 हजार लोकांनी लाईक केलं आहे. तसेच या व्हिडीओला अनेकांनी कमेंटही केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

महत्वाच्या बातम्या-

वडिलांचा कोरोनाने मृत्यू; त्यानंतर मुलीनं केलेलं कृत्य ऐकून…

धक्कादायक! मेट्रो जात असताना अचानक पूल कोसळला अन्…,…

पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी ती चक्क सिंहाशी भिडली…

पुणे हदरलं! तडीपार गुंडाने केला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा…

लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी शिकवली अद्दल,…