Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

‘तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का?’, अमृता फडणवीस म्हणतात…

Amruta Fadanvis 10 e1596551824807

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे भाजपचे मोठे आणि आघाडीचे नेते आहेत. ते नेहमीच राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी असतात आणि चर्चांच्या सुद्धा. हा त्यांचा वारसा त्यांच्या पत्नीकडे देखील आहे.

देेवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) देखील आपली वक्तव्ये, गाणी आणि वेगवेगळ्या कारणाने सतत चर्चेत असतात. त्यांचा दिलखुलास आणि बिंधास्त स्वभावामुळे त्यांची अल्पावधीतच लोकांना ओळख झाली आहे.

आता त्या झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘बस बाई बस’ (Bas Bai Bas) या कार्यक्रमात आल्या होत्या. यावेळी त्यांनी गप्पा मारल्या, काही आठवणी सांगितल्या तसेच उपमुख्यमंत्री फडणवीसांचे काही किस्से सांगून हशा पिकवला.

यावेळी निवेदक सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी त्यांना विविध प्रश्न विचारले. त्यांनी सुद्धा त्यांची खुमासदार उत्तरे दिली. यावेळी त्यांच्या उत्तरांनी त्या खूप आधुनिक विचारांच्या आहेत, असं बघ्यांच्या लक्षात आलं.

यावेळी त्यांना महिलामंडळाने अनेक प्रश्न विचारले आणि त्यांनी त्याला साजेशी उत्तरे दिली. यावेळी त्यांना मंगळसूत्राबद्दल प्रश्न विचारला. तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घालत नाही तर सासूबाई तुम्हाला ओरडत नाहीत का?

त्यावर बोलताना फडणवीस म्हणाल्या, मंगळसूत्र हे सौभ्यागाचे प्रतिक आहे. ते गळ्यात घातलं तर पतीने तुमचा गळा पकडला की काय? असं वाटतं, त्यामुळे देवेंद्रजींनी सतत माझा हात धरला आहे.

यावेळी त्यांनी तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी नकार देत, फडणवीसांना माझा चेहरा नाही तर मन आवडतं, असे त्या म्हणाल्या. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केलाय.

त्यांना देवेंद्र फडणवीस यांचा फोटो स्क्रीननर दाखवला असता, त्या म्हणाल्या वा! आज वेळ मिळाला का? आज कुठे, आसामला नेणार का? असे त्या म्हणाल्यावर एकच हशा पिकला.

महत्वाच्या बातम्या – 

‘गुजरात दंगलीतून नरेंद मोदींना…’; उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

“अखेर नड्डा देखील सब घोडे बारा टक्के निघाले”

भारतात 2024 पर्यंत अमेरिकेसारखे रस्ते होणार- नितीन गडकरी

उर्फीने कपड्यांऐवजी गुंडाळल्या तारा, पाहा व्हिडीओ.

मनसेचे शिंदे गटावर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ