मी बोलते ‘ते’ मीच बोलते….. ना की देवेंद्र फडणवीसांची बायको म्हणून- अमृता फडणवीस

मुंबई | देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रोल होतात. मात्र ट्रोलिंगमध्ये मला काही वाटत नाही. मला ट्रोलिंग झालं की रणांगणावर असल्यासारखं वाटतं. कुणीतरी माझ्यावर इकडून तिकडून वार करत असल्याचा मला भास होतो. मात्र ट्रोलिंग करणं ही महाराष्ट्राची चूक नाहीये. महाराष्ट्राने हे कधीही पाहिलेलं नाहीये की नेत्याची बायको व्यक्त होतीये. मी बोलते ‘ते’ मीच बोलते….. ना की देवेंद्र फडणवीसांची बायको म्हणून, असं परखड मत देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. त्या ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत आहेत.

मी व्यक्त होणं ही लोकांसाठी नवीन गोष्ट होती. तरी मी सांगू इच्छिते की मी बोलते ‘ते’ मीच बोलते ना की एक अमृता बँकर…. ना की देवेंद्र फडणवीसांची बायको किंबहुना ना की भाजपची पाठीराखी म्हणून, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

अमृता फडणवीस एक स्वतंत्र व्यक्तीमत्व म्हणून बोलतीये हे महाराष्ट्राने स्विकारायला हवं. पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रात हा बदल व्हायला हवा, अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यंदाच्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अ‌ॅसिड अ‌ॅट‌ॅक व्हीक्टिमसाठी आम्ही एक गीत घेऊन येतोय. हे गीत त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरेल तसंच त्यातून ते स्फूर्ती घेतील, असंही अमृता यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-ट्रोलिंग झालं की मला रणांगणावर असल्यासारखं वाटतं- अमृता फडणवीस

-बजेट सादर करताना बऱ्याच त्रुटी होत्या- पृथ्वीराज चव्हाण

-धोनी इज बॅक…. चेन्नईच्या मैदानात लागोपाठ लगावले 5 गगनचुंबी षटकार!!! पाहा व्हीडिओ

-विकासाचा रूतलेला गाडा अर्थसंकल्पाने पुन्हा प्रगतीपथावर येईल- काँग्रेस

-ऐस बँकेच्या खातेदारांना दिलासा; स्टेट बँक खरेदी करणार मोठा हिस्सा