अमृता फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख; सोशल मीडियावर टीकेच्या धनी

मुंबई |  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केल्याने त्या वादात सापडल्या आहेच. अमृता फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना, त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियात टीकेची झोड उठली आहे.

देश राष्ट्रपिता म्हणून फक्त महात्मा गांधी यांचाच आदराने उल्लेख करतो पण अमृता फडणवीस यांनी थेट पंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केल्याने त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे.

आपल्या देशाचे पिता नरेंद्र मोदीजी, जे समाजाच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेण्याची प्रेरणा देतात त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच लक्ष्य केलं.

अमृता फडणवीस यांनी या ट्विटसोबत ‘ओ रे मनवा तू तो बावरा है, हे स्वत:च्या आवाजात गायलेलं गाणं ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांचे पती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाळ्या वाजवताना दिसत आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 69 वा वाढदिवस आहे. याच वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

महत्वाच्या बातम्या-