मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा- अमृता फडणवीस

मुंबई | मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा. मी सामान्य नागरिक म्हणून बोलते. मी रोज सामान्य स्त्री सारखी घराबाहेर पडते, असं भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मलाही ट्रॅफिक आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होतो. रस्त्यावर ट्रॅफिक आहे, खड्डे आहेत. ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात. कारण आपण कुटुंबाला वेळ देत नाही. मुंबईत अनेक इश्यू आहेत. मेट्रो, रस्ते, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष न देता सरकार खिसे भरू लागले तर त्यावर टीका होणारच, असंही ते म्हणाले.

तुम्ही या मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे. ती मुंबईची गरज आहे, असं त्या म्हणाल्या. तसेच नॉटी वगैरे नावं लोकांनीच दिली आहेत. त्याचा अर्थ शब्दश: घेऊ नका. त्याचा भावार्थ समजून घ्या, असंही त्या म्हणाल्या.

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule and Pankaja Munde) या दारू पितात, नाचतात असं वादग्रस्त विधान बंडातात्या कराडकर यांनी केलं आहे.

संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटत आहेत. अनेक ठिकाणी बंडातात्यांच्या पुतळ्याचं दहन केलं जात आहे. हा वाद वाढत चालल्याने बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे. यावरही अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

स्त्रियांच्या खासगी आयुष्यावर बोलणं चुकीचं आहे. ही मानसिकता अशी बदलावी लागेल, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी बंडातात्यांवर टीका केली आहे.

खासगी आयुष्य आणि राजकारण या दोन गोष्टी वेगळ्या ठेवाव्यात. पर्सनल कमेंट करू नये. एखाद्या नेत्याने पत्नीला पार्टनर केलं, तिला काही कंपनीत रोल दिला. तिथे जर घोटाळा झाला तर त्याबाबतही सावध भूमिका असायला हवी, असं मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या- 

टीम इंडियाचा नवा Test Captain कोण?, सौरव गांगुलीने स्पष्टचं सांगितलं 

“मला फक्त मुंबईत येऊ द्या, मग मी बघतो काय करायचं ते”

“देशात पाॅर्न इंडस्ट्री बनू नये, तुम्ही मला बोल्ड म्हणत असाल तर…”

शेअर मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांनो…’हे’ काम करा नाहीतर डीमॅट अकाऊंट बंद होईल

रोहित शर्माचं टेन्शन वाढलं! टीम इंडियाचा ‘हा’ मॅच विनर फिटनेसमुळे अडचणीत