मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी थेट माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.
ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटकेत असलेला जयदीप राणा तसेच एनसीबी ऑफिसमध्ये ये-जा असणारा नीरज गुंडे या दोघांचेही फडणवीस यांच्याशी जवळचे संबंध आहेत, असा खळबळजनक आरोप मलिक यांनी केलाय.
मागील काही दिवसांपासून नवाब मलिक एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना लक्ष्य करत आहेत. पण त्यांनी आपला मोर्चा आता फडणवीस यांच्याकडे वळवल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर जयदीप राणा तसेच नीरज गुंडे नेमके कोण आहेत, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या प्रकरणावर अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीस आणि मी आम्हा दोघांच्या दोन आयडेंटिटी आहेत. मी गायिका आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. माझ्या अंगावर कोणी आलं तर मी त्याला सोडणार नाही, असं त्या म्हणाल्या.
मी खऱ्याची साथ सोडत नाही आणि असत्याला साथ देणाऱ्यालाही सोडत नाही, असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय.
या गाण्यात बॉलिवूडचे अनेक कलाकार सहभागी झाले. मीही झाले. देवेंद्र फडणवीसही झाले. त्यानंतर रिव्हर मार्चनेही आमच्यासाठी एक गाणं बनवा, असं त्यांना सांगितलं. सचिन गुप्तांनी त्याला होकार दिला. त्यानंतर सचिन गुप्ताने दिग्दर्शनासाठी मदत केली, असं अमृता फडणवीसांनी सांगितलं.
रिव्हर मार्चने गाणं तयार केलं. फुकटात गाणं तयार केलं. त्या गाण्यात कोळी समाज आणि डब्बेवाले आले. ते एक पैसा न घेता आले. मनात आलं असतं तर शाहरुख आणि सलमानलाही घेतलं असतं, असंही अमृता फडणवीस म्हणाल्यात.
आम्हाला कोणतीही राजकीय अभिलाषा नाही. त्यांच्या मागे हात धुवून लागलात हे कोणतं राजकारण आहे. तुम्हाला राजकारण करायचं आणि बिगडे नवाब व्हायचं आहे तर तुम्ही बिगडे नवाबची एनर्जी सुधरे नवाबमध्ये कन्व्हर्ट करा. तरच महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो, असंही त्या म्हणाल्यात.
बिगडे नवाबला हे सवाल तुम्हाला विचारावे लागतील. त्यांच्या बॉसला किंवा त्यांच्या सूपर बॉसला, असं म्हणत अमृता फडणवीसांनी नवाब मलिकांवर नाव न घेता टीकास्त्र सोडलं.
महत्वाच्या बातम्या –
राष्ट्रवादीला गेल्या दोन दिवसात लागोपाठ दुसरा झटका, आता ‘या’ मंत्र्याची संपत्ती होणार जप्त
“…तर मी फोटोग्राफी केली असती आणि फडणवीसांना प्रदर्शनाला बोलावलं असतं”
पवार कुटुंबीयांनी महाराष्ट्राला लुटलं आहे- किरीट सोमय्या
मी सरळमार्गाने आणि नैतिकतेला धरून चालणारा व्यक्ती- अनिल देशमुख
नवाब मलिकांच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले…