एका कलाकाराने पेन्सिलच्या टोकावर सोनू सूदची प्रतिमा साकारत त्याच्या कर्तुत्वाला सलामी दिली!

नवी दिल्ली | देशात टाळेबंदी झाल्यापासून अभिनेता सोनू सूदने अनेकांना मदत केली आहे. सार्वजनिक सेवा बंद असल्याने बरेचसे मजूर आपापल्या गावाला काही सुविधा नसल्याने चालत जात होते.

यासाठी सोनू यांनी बसची व्यवस्था करून त्यांना सुखरूप घरपोच पोहोचवले. गरजूंच्या जेवणाचीही व्यवस्था त्याने केली. एवढेच नाही तर परदेशातील भारतीयांनाही त्यांनी घरपोच पोहोचवले. काही विद्यार्थी परदेशात अडकले होते, त्यांच्यासाठी खास विमानाची सोय करून त्यांना घरी पोहोचवले.

सोनू सूद यांच्या या निस्वार्थी मदतीमुळे अनेक कलाकार त्यांना विविध कलेच्या आधारे आभार मानत आहे. यातच एका कलाकाराने चक्क पेन्सिलच्या टोकावर सोनू सूद यांचे चित्र साकारले आहे.

या कलाकाराने हा फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. सोनू सूद यांना टॅग करून त्यांनी हा फोटो टाकला होता. सोनू सूद यांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. सोशल मीडियावर या कलाकाराचे अनेकांनी कौतुक केले आहे.

कलाकार मिथुल प्रजापती यांनी हा फोटो ट्विटरवर टाकून त्यात लिहिले, पेन्सिलच्या टोकावर सोनू सूद यांची प्रतिमा साकारली आहे. सर तुम्ही खूपच चांगले काम करत आहात. लव्ह यु सर.

यातच सोनू सूद यांनी काही न लिहिता या पोस्टला शेअर केले आहे. अशा या अनोख्या कलेचे लोक भरभरून कौतुक करत आहे. त्यातील दीपक कुमार यांनी लिहिलंय, या कलेला आणि कलाकाराला सलाम. हे सोनू सूद यांच्याइतकेच भारी आहे.

सोनू सूद यांनी आतापर्यंत अनेकांना मदत केली आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावर रोज हजारो मेसेज मदतीसाठी येतात. सोनू सूद यांच्याकडे आलेल्या प्रत्येकाला ते निस्वार्थीपणे मदत करत आहे. त्यांच्यामुळे काही लोकांच्या शस्त्रक्रियाही मोफत झाल्या आहे.

सोनू सूद यांच्या या कामामुळेच त्यांना २८ सप्टेंबर रोजी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (युएनडीपी) यांच्या प्रतिष्ठित एसडीजी (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स) स्पेशल ह्युमनटॅरिअन पुरस्काराने सन्मानित केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘पक्षांतराची बातमी ऐकताच भाजपचा ‘तो’ नेता मला फोन करून म्हणाला…’; एकनाथ खडसेंचा धक्कादायक खुलासा!

शिखर धवन पुन्हा तळपला! या आयपीएलमध्ये आणखी एक विक्रम स्वतःच्या नावावर केला

चित्रपट सृष्टीला मोठा धक्का! ‘या’ बड्या अभिनेत्याची भरदिवसा चाकूने वार करून ह.त्या

ख्रिस गेलनं आयपीएलमध्ये रचला नवीन इतिहास! कोणीही न करू शकलेला विक्रम करून दाखवला