काळीज पिळवटून टाकणारा अपघात; बाईकला ट्रकची धडक, आठ महिन्यांच्या बाळाचा जागीच मृत्यू

बुलडाणा | बुलडाणा जिल्ह्यात (Buldhana) खामगावमधील घाटपुरी जवळ एक दुर्दैवी घटना धडली. रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकाला भेटून परत येत असताना हा अपघात घडला. अपघातामध्ये दुचाकीवरील 8 महिन्यांचे बाळ जागीच मृत्युमुखी पडले, तर बाळाचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत.

स्पीड ब्रेकरवर दुचाकीचा वेग कमी केल्याने मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील आठ महिन्यांचे बाळ जागीच मृत्युमुखी पडले.

बाळाचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहराजवळ असलेल्या घाटपुरी देवीजवळ रविवारी सायंकाळी घडली.

या घटनेमुळे रस्त्यावर काही काळ ट्राफिक जाम झाला होता, मात्र पोलिसांनी घटनास्थळ गाठून तात्काळ वाहतूक कोंडी दूर केली.

जामोद तालुक्यातील खांडवी येथील आनंद चांडक हे आपली पत्नी दुर्गा चांडक आणि 8 महिन्याचं बाळ हंस चांडक यांच्यासोबत खामगाव येथील रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी आले होते.

ते घरी परतत असताना खामगाव शहराजवळ घाटपुरी देवी जवळील स्पीड ब्रेकरवर चांडक यांनी आपल्या दुचाकीचा वेग कमी केला असता मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली.

महत्वाच्या बातम्या- 

“24 तास पोलिसांना सुट्टी द्या, मग बघा आम्ही कुठे कुठे चप्पल घालतो…” 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; सरकार हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

“बाळासाहेबांनतर हिंदूह्रदयसम्राट पदवी देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी”

“काहींनी सांगितलं मी येणार मी येणार, पण आम्ही काय येऊन देतो का?”