जिममध्ये तरुणावर अदृश्य शक्तीने केला हल्ला अन्…; हलक्या काळजाच्या लोकांनी व्हिडीओ पाहू नका

मुंबई | सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करणारे असतात तर काही व्हिडीओ आपल्याला धडकी भरवणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या विश्वात भूत, देव आहेत की नाही याविषयी आजपर्यंत कोणीही ठामपणे सांगू शकलं नाही. मात्र, चित्रपटामध्ये किंवा व्हिडीओमध्ये भूत पाहिलं तरी संपूर्ण अंगाला घाम फुटतो. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ पाहिल्यावर देखील असंच काहीसं होत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका जिममधील आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीवर अदृश्य शक्तीने हल्ला केल्याचं दिसत आहे. ही संपूर्ण घटना जीममध्ये असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये कैद होते आणि हाच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती जिममध्ये आला आहे. तो जिमसाठी तयार होत आहे. संपूर्ण जिममध्ये त्या व्यक्तिशिवाय दुसरं कोणीच नाही. जिममध्ये तो एकटाच आहे. हा व्यक्ती जिमसाठी तयार होत असतो तेव्हा त्याच्या पाठीमागे असलेलं TRX सस्पेंशन अचानक हलू लागतं. मात्र, त्याच्याकडे या व्यक्तीचं लक्ष जात नाही.

त्यानंतर जिममधील एक भला मोठा चेंडू आपोआप मागेपुढे होऊ लागतो. हे पाहून तो व्यक्ती प्रचंड घाबरतो आणि आपली बॅग उचलून दरवाजाच्या दिशेने पळायला सुरुवात करतो. तो व्यक्ती जिममधून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो तसा तो जमिनीवर जोरात आदळतो.

यानंतर कोणीतरी त्याचे पाय धरून खेचू लागतो. तेव्हा या व्यक्तीला काहिही सुचत नाही. तो कसाबसा त्या अदृश्य शक्तीच्या तावडीतून सुटतो आणि जिममधून बाहेर पडतो.

दरम्यान, या व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं आहे? याविषयी कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. जिममधील हा व्हिडीओ सुरुवातीला टिकटॉकवर व्हायरल झाला होता. यानंतर आता हा व्हिडीओ काही यु ट्यूब चॅनेल्सने देखील शेअर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

सीतेच्या भूमिकेसाठी करीनाने 12 कोटी रुपये मागितले का? करीना मौन सोडत म्हणाली…

“‘शेरशाह’ चित्रपट करून चूक केली, असं मला वाटू लागलं आहे”

अरे बापरे! सलमान चक्क घोड्यासोबत खातोय चारा, व्हिडीओ व्हायरल

विद्युत जामवालच्या डेटिंगची सर्वत्र चर्चा, करिश्मासोबत आहे खास कनेक्शन

…म्हणून माधुरी आणि भारती चालू कार्यक्रमात ढसाढसा रडल्या, पाहा व्हिडीओ