मोठी बातमी! श्रीवर्धन समुद्र किनारी संशयास्पद बोट आढळल्याने खळबळ

रायगड | जिल्ह्यातील श्रीवर्धन (Shriwardhan) येथील समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीत हत्यारे (Arm) आढळून आली आहेत. या बोटीत 3 एके 47 (AK – 47) बंदुका सापडल्या आहेत.

तीन बंदुकांसोबत काही कागतपत्रे देखील आढळून आली आहेत. तसेच हरीहरेश्र्वर येथे एक लहान बोट सापडली असून त्यात काही लाइफजॅकेट आणि इतर साहित्य आढळले आहे.

या संशयीत वस्तू सापडल्यानंतर रायगड पोलिसांनी (Raigad Police) जिल्ह्यात हायअलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्र एटीएसची (Anti Terrorist Squad) एक टीम घटनास्थळी पोचण्यास रवाना झाली आहे.

या बोटीत 200 ते 225 जिवंत काडतूसे सापडली आहेत. सकाळच्या सुमारास पोलीस गस्त घालत असताना पोलिसांना ही बोट आढळून आली त्यानंतर त्यांनी याची माहिती दिली.

येत्या काही दिवसांत सार्वजनिक सणांना सुरुवात होत आहे. त्यामुळे ह्या संशयास्पद बोटींची आता पोलीस विशेष चौकशी करत आहेत. पोलिसांनी रायगड जिल्ह्यात हायअलर्ट जारी केला आहे.

या संदर्भात स्थानिक आमदार अनिकेत तटकरे (Aniket Tatakare) यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. तर अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली. याप्रकरणाची तात्काळ समिती नियुक्त करुन चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बिहारमध्ये पुन्हा राजकीय भूकंप येणार? प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

“…म्हणून नितीन गडकरींचं महत्व कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न”

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; घेतला ‘हा’ निर्णय

देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात? भाजपने दिली मोठी जबाबदारी

काँग्रेसचे ‘हे’ बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीला