…तर संजय राऊतांचा पराभव झाला असता; या पोस्टनं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ

पुणे । राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे. अपक्षांची मतं फुटल्याने भाजपचे धनंजय महाडिक विजयी झालेत. या निकालानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. त्यातच राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी यांनी केलेल्या एका पोस्टनं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे संजय राऊत यांचा देखील पराभव होऊ शकला असता याकडे ही पोस्ट लक्ष वेधते.

काय म्हणाले आहेत विश्वंभर चौधरी?

“मविआ मधला सगळ्यात मोठा पक्ष असून सेनेला (लोकलमध्ये चौथी सीट मिळावी तशी) एकच आणि ती देखील शेवटची सीट मिळाली. संजय राऊत बालंबाल बचावले. समजा भाजपानं स्वतःच्या दोन उमेदवारांचा कोटा 48 ऐवजी 45 ठेवला असता आणि एक मत महाडिक आणि दोन मतं सेनेच्या संजय पवारांना दिली असती तर काय झालं असतं?”, असं विश्वंभर चौधरी यांनी म्हटलं आहे.

याचाच अर्थ असा की भाजपने ठरवलं असतं तर संजय राऊत यांना पराभूत करता आलं असतं. भाजपनं मतांचं व्यवस्थित मॅनेजमेंट केलं असतं आणि उरलेली मतं शिवसेनेच्याच संजय पवार यांना दिली असती, तर संजय राऊत यांच्यापेक्षा संजय पवार यांना जास्त मतं मिळाली असती आणि असं झालं असतं तर संजय राऊत पराभूत झाले असते, असं विश्वंभर चौधरी यांच्या पोस्टमागचं गणित आहे.

अर्थातच हा सगळा जर तरचा भाग होता, मात्र राजकीय गणितं जुळली असती तर राज्याच्या राजकारणात ही धक्कादायक गोष्ट घडू शकली असती हेही तितकंच खरं आहे. राजकारणात काहीही अशक्य नसतं हे या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आलं आहे. त्यामुळे मोठे राजकीय डावपेच टाकताना राजकीय पक्षांना येत्या काळात जास्त विचार करावा लागणार आहे, नाहीतर तेलही गेलं… तूपही गेलं आणि हाती धुपाटणं आलं अशी गत होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या- 

चक्क शरद पवार यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक, म्हणाले… 

Rajyasabha Election Result | तिन्ही उमेदवार विजयी होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Rajya Sabha Election Result | अखेर निकाल लागला; संजय राऊतांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी 

“ईडीचा डाव फसला, आता रडीचा डाव सुरू झाला, तरी आम्हीच जिंकू”

Rajyasabha Election | सर्वात मोठी बातमी; राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट