अशाप्रकारे ‘या’ शिक्षिकेनं 13 महिन्यात कमावले 1 कोटी रुपये वेतन

लखनऊ | उत्तर प्रदेशातील एका शिक्षिकेनं १३ महिन्यात कथित १ कोटी रुपये वेतन कमावल्याचा प्रकार समोर आला आहे. २५ वेगवेगळ्या शाळांमध्ये काम करत असल्याचं दाखवून हा प्रकार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

शिक्षकांचा डाटाबेस तयार करत असताना ही धक्कादायक घटना उजेडात आली. आता याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून या प्रकाराची एकच चर्चा सुरु झाली आहे.

अनामिका शुक्ला ही शिक्षिका कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात विज्ञान विषय शिकवते. तिच्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज, आंबेडकरनगर, अलिगड, सहारनपूर, बागपत अशा जिल्ह्यांतील केजीबीव्ही शाळांमध्ये अनामिकाची पोस्टिंग सापडली आहे. या शाळांमध्ये शिक्षकांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने केली जाते आणि त्यांना दरमहा ३० हजार रुपये पगार दिला जातो. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कस्तुरबा गांधी शाळा आहे. त्यामुळे अशाप्रकारे आणखी जण फसवणूक करत नाहीत ना? याचीही चौकशी केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अडचणीच्या काळात काँग्रेसला आणखी एक धक्का; ‘या’ आमदारानं सोडली साथ

-गर्भवती हत्तीण मृत्यू प्रकरणात प्रशासनाच्या जोरदार हालचाली; केली ‘ही’ धडक कारवाई!

-वाढदिवस स्पेशल | नरेंद्र मोदींसोबत पंगा घेणारा माणूस; काय घडला होता नेमका प्रकार?

-RTI अंतर्गत PM केअर फंडाबाबत विचारले होते प्रश्न; PM कार्यालयाने उत्तरं दिली नाहीत!

-लोकांचा अंत सरकारने पाहू नये, वीस लाख कोटीच्या पॅकेजची पुनर्रचना करावी- प्रकाश आंबेडकर